Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Big Breaking : वाघाची शिकार करून पुरले जमिनीत

उच्च दाबाच्या विद्युत ताराच्या सहाय्याने वाघाची शिकार झाल्याचा प्राथमिक अंदाज.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सचिन कांबळे, 

मोसम गावालगत असलेल्या शिकार झालेल्या घटनास्थळापासून काही अंतरावर ताराचे तुकडे आढळून आले आणि त्यालगतच ११ के.व्ही. उच्च दाबाची विद्युत गेली  त्याच जिवंत तारेवरून वन्यप्राण्याची शिकार करण्याहेतू जिवंत ताराचे जाळे पसरवून ७ ते ८ दिवसाआधी वाघाची शिकार केली असावी असा अंदाज आहे .सदर घतनास्थलावर तार वाळलेल्या झाडावरून गेल्याने झाडही जळलेल्या अवस्थेत असल्याचे प्रथमता दिसून आले आहे  शिकाऱ्यांनी वाघाची घटना उघडकीस येऊ नये यासाठी नाल्याच्या काठावरील जमिनीत पुरून ठेवले असावे असा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली, दि. ३० डिसेंबर :  आलापल्ली वनविभागा अंतर्गत असलेल्या अहेरी वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्र मोसम मधील कक्ष क्र. ६१५ मध्ये वाघाची शिकार करून अवयवाची तस्करी केल्याची घटना दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आल्याने आलापल्ली वन विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी वनपरिक्षेत्रातील मोसम गावालगत असलेल्या कक्ष क्र. ६१५ मध्ये वनरक्षक कैलास परचाके, अतुल आतलाम, वनपाल नरेंद्र वडेट्टीवार हे दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी  जंगल गस्तीवर असतांना यांना ओढ्यालगत दुर्गंधी (उग्रवास) येत असल्याने ते सदर दिशेने गेले असता ओढ्याच्या पात्रात रेतीवर वाळलेल्या वृक्षाची फांदी ठेवली होती व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माश्या बसलेले दिसले. सदर बाब त्यांनी उपविभागीय वनाधिकारी, आलापल्ली नितेश देवगडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी अहेरी व आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन मोका स्थळावर दाखल झाले. सदर बाब अहेरीचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तरेश्वर सुरवसे यांना कळवताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मोकास्थळावर दाखल झाले. सदर मोकास्थळावर दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास तपास केला असता जमिनीत काहीतरी पुरून असल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी NTCA यांच्या मार्गदर्शक सूचनेच्या अनुषंगाने मोक्यावरती असलेली फांदी बाजूला करून पुरून असलेल्या ठिकाणची रेती काढल्यानंतर वन कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. कारण त्याठिकाणी चक्क वाघालाच पुरून असल्याचे आढळून आले. मात्र  मृत वाघ सात ते आठ दिवसाआधी जमिनीत पुरल्याने  मोठ्या प्रमाणात उग्रवास (दुर्गंधी) व जंतू निर्माण झाले असल्याने वनकर्मचाऱ्यांना अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे मोठ्या जीकरीने खोलवर तपास करतांना मृत वाघाचे पंजे व डोक नसल्याचे उघडकीस आले. त्यावेळी वाघाची शिकार करून अवयवाची तस्करी करण्याच्या हेतूने शिकार केली असावी असा अंदाज वनाधिकाऱ्यांने व्यक्त केला.

मोसम गावालगत असलेल्या शिकार झालेल्या घटनास्थळापासून अंदाजे ३०० मीटर अंतरावर ताराचे तुकडे आढळून आले. त्यालगतच ११ के.व्ही. उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाच्या वाहिनीवरून बाईडिंग तारेद्वारे विद्युत प्रवाह वनात अंदाजे १ किमी पर्यंत वाहून नेण्यात आले होते. त्याच तारेच्या स्पर्शाने सदर वाघाचे शिकार करून  ७ ते ८ दिवसाआधी जमिनीत पुरून ठेवले असावे, असा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असला तरी वाघाचे वावर सदर परिसरात नेहमीच आढळून येत असल्याने वन विभागाने दिवंडी देऊन सुरक्षित राहण्यासाठी आवाहनही केले होते. मात्र चक्क वाघाचीच शिकार झाल्याने वन विभागात खळबळ उडाली असून वन विभागासमोर आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी कसरत लागणार आहे.

मोकास्थळावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तरेश्वर सुरवसे, डॉ. पवन पावळे, डॉ. ज्ञानेश्वर गव्हाणे यांच्या पॅॅनलने सदर वाघाच्या शवाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाच्या वेळेस आशिष पांडे (भारतीय वन सेवा), उदय पटेल वन्यजीव मानद रक्षक तथा NTCA प्रतिनिधी, लक्ष्मण कन्नाके सरपंच देवलमरी, श्रीनिवास राउत, अध्यक्ष स.व.स.मोसम, जगन्नाथ मडावी, माजी उपसरपंच देवलमरी, दीपक वाढरे, निसर्ग सखा संस्था (NGO) गोंडपिपरी यांची उपस्थित  होती.

सदर घटनेस्थळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोका पंचनामा केला व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या पॅॅनलने सदर वाघाचे शवविच्छेदन केले  असता वाघाचे शव हे पूर्ण वाढ झालेल्या मादी वाघिणीचे असून सदर वाघिणीचे शीर धडापासून वेगळे केले होते व चारही पायाची वाघ नखे काढलेली होती. शव पूर्णपणे सळलेल्या अवस्थेत होते. सदर शवाचे विसेरा, हाड, त्वचाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविण्यासाठी घेण्यात आले. नियमाप्रमाणे सदर मृत मादी वाघिणीचे शव कार्यवाही अंती पंच व NTCA पॅॅनल समक्ष दहन करण्यात आले.

या घटनेचा अधिक तपास गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर , उपवनसंरक्षक आलापल्ली राहुल सिंह टोलीया, उपविभागीय अधिकारी नितेश देवगडे यांच्या मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिल्पा शिगोन करीत आहे.

दोन वर्षाआधी उच्च दाबाच्या विद्युत तारेवरून शिकारीच्या नादात शिकारीचीच झाली दोन वन्यप्राण्यांसह शिकार

मोसम जंगल परिसरात दोन वर्षाआधी वनविकास महामंडळाच्या कक्षामध्ये उच्च दाबाच्या विद्यत तारेवरून जाळे पसरवून शिकार करणाच्या नादात शिकार करणाराच त्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श होऊन दोन वन्यजीवासह शिकारीच ठार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. आणि पुन्हा अशाच पद्धतीची घटना समोर आल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यासमोर अशा घटनांना आळा घालण्यात अपयश आले असून सदर घटना वेळोवेळी घडत असून वन विभागाचे कर्मचारी अशा घटनांकडे दुर्लक्ष करीत तर नाही ना? असाच प्रश्न वन्यजीव प्रेमी कडून केला जात आहे.

 

हे देखील वाचा : 

महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) ५९४ जागांसाठी मेगा भरती

अबब!! आता न्यायाधीशच्या जागी मशीन लावणार निकाल!

Comments are closed.