Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीतील पुराला भाजप जबाबदार

मेडीगड्डा प्रकल्पावरून नाना पटोलेंचे टीकास्त्र.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 29 जुलै :-  राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. यामुळे गडचिरोली जिल्ह्याला मोठा फटका बसला. पण हे संकट अस्मानीसह सुल्तानी आहे. भाजपने नियम धब्यावर बसवून बांधलेला मेडीगड्डा प्रकल्प याला कारणीभूत असल्याची टीका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते पूरपरिस्थीचा आढावा घेण्यासाठी गडचिरोली येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
पटोले म्हणाले, अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. दक्षिण भागात विषेशकरून सिरोंचा तालुक्यातील जवळपास पंचविस गावे उध्वस्त झाली. मेडीगड्डा धरणामुळे ही गावे पाण्याखाली आले. हा प्रकल्प उभारणीच्या वेळेला आम्ही जी भीती व्यक्त केली होती ती आता सत्यात उतरत आहे. या परिस्थीतीला तत्कालीन भाजप जबाबदार असून सर्व नियम धाब्यावर बसवून बळजबरीने तेलंगणा सरकारने हे महाकाय धरण बांधले. मी अध्यक्ष असताना याबाबत चैकशीची सूचना केली होती. असेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे गचडचिरोलीचे पालकमंत्री होते पण, त्यांनी या भागाला भेट दिली नाही. त्यांना सुरजागडमध्येच अधिक रस असल्याचा टोलाही पटोले यांनी यावेळी लगावला. पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यत जे नुकसान झाले त्याची भरपाई म्हणून शासनाने तत्काळ हेक्टरी 75 हजाराची मदत जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली. सोबतच येत्या अधिवेशनात मेडीगड्डाचे प्रकरण आम्ही लावून धरणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

सुरजागडमध्ये बेकायदेशीर उत्खनन

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर सुरू असलेले लोह खनीजाचे उत्खनन बेकायदेशिर आहे. उत्खननाच्या नावाखाली त्याभागातील लाखो झाडांची कत्तल करण्यात आली. आम्ही त्या भागातील उपग्रह छायाचित्र मागविले असून लवकरच त्याठिकाणी भेट देउन आंदोलन करणार असल्याचेही पटोले म्हणाले.

हे तर ईडीचे सरकार
राज्यात नुकतेच स्थापन झालेले सरकार हे ईडीच्या जोरावर आले असून आमदारांना ब्लॅकमेलींग करून भाजपने सत्तांतर घडवल्याची टीका नाना पटोले यांनी केली. यावेळी त्यांनी हे सरकार पूर्णपणे बेकादेशीर असल्याचे सांगून आंधळे व बहीरे सरकार अशी उपमा दिली. बच्चू कडू यांनी नानांनी दिव्यांगांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देतांना पटोले यांनी माझ्या वक्तव्यात दिव्यांगांचा अपमान होईल असे काहीच नसल्याचे म्हटले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अजीत दादांना यातलं काय माहीत
काल राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार गडचिरोलीला आले असताना सुरजागड प्रकल्पामुळे हजारो रोजगार निर्माण झाल्याचे सांगून पाठराखन केली होती. यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नानांनी अजित पवारांना यातलं काहीच माहिती नाही. कोणीतरी दिलेल्या माहितीवरून ते बोलत असून आम्ही त्यांना माहिती देऊ असे सांगितले. त्यांना मेडीगड्डा धरणाबद्दलही अपूर्ण माहिती आहे. एकीकडे गोसेखूर्द बांधायला तीन पिढ्या गेल्या आणि मेडीगड्डा सारखं मोठं धरण जलद उभारण्यात आल्याचा टोलाही नानांनी यावेळी लगावला.

हे देखील वाचा :-

.. पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार…

 

Comments are closed.