जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
श्रीनगर डेस्क : सणाच्या तोंडावरच पाकस्तानने आपल्या भ्याडपणा दाखवत शुक्रवारी नियंत्रण रेषेवर विविध भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या दरम्यान भारताचे २ जवान शहीद झाले असून ४ भारतीय नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारतीय लष्कराने दिलेल्या माहिती नुसार, नियंत्रण रेषेजवळ करेनपासून ते उरी सेक्टरपर्यंत अनेक ठिकाणी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय लष्कर पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर देत आहे.
बारामुल्ला येथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. या कारवाईत जखमी झालेले दोन जवान शहीद झाले. याच बीएसएफ जवान राकेश डोभाल यांचा समावेश आहे. राकेश डोभाल हे उत्तराखंडमधील ऋषिकेशच्या गंगानगरचे रहिवासी होते. ते बीएसएफ आर्टी रेजिमेंटचे सदस्य होते आणि कॉन्स्टेबल पदावर तैनात होते.
बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, आज १२ वाजून २० मिनिटांनी पाक सैनिकांशी दोन हात करताना जवानाच्या डोक्याला गोळी लागली होती. तर दुसरीकडे पुंछ जिल्ह्यातील सवजियान परिसरात देखील पाकिस्तानने गोळीबार केला. तेथेही भारतीय सेनिक जशासतसे उत्तर देत आहेत.
जम्मू आणि काश्मीरच्या कमलकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जखमी नागरिकांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उरीच्या कमलकोटव्यतिरिक्त बांदीपोरा येथील गुरेज सेक्टर आणि कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये देखील पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
Comments are closed.