Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्राला केंद्राचं निसर्ग चक्रीवादळासाठी 268 कोटी मंजूर.

केंद्र सरकारने विविध राज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 4381.88 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारने विविध राज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 4381.88 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वातील समितीनं सहा रांज्यासाठी हे पॅकेज जाहीर केले. महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानासाठी 268.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाई पोटी 1 हजार 65 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईसाठी 1 हजार 65 कोटी रुपये मागितले होते. मात्र, महाराषट्राला अवघे 268 कोटी 59 लाख मंजूर करण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या सहा राज्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रासोबत, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश, सिक्कीम या राज्यांना देखील मदत करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला तटपुंजी मदत करण्यात आलीय.

‘अम्फान’ वादळाचा सामना करणाऱ्या पश्चिम बंगालला सर्वाधिक मदत जाहीर करण्यात आली आहे. 4381.88 पैकी 2707.77 कोटी रुपये पश्चिम बंगालला देण्यात आले आहेत. अम्फान वादळासाठी बंगालला यापूर्वी 1 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.या मदतीला आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.