Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कमलापूर,पातानील येथील हत्ती हलविण्याच्या विरोधात आलापल्लीत भाजपा कार्यकत्यांनी केले चक्काजाम आंदोलन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गुजरात राज्यातील जामनगरातील राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपविण्यासाठी अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने यासंदर्भात बुधवारी ११ मे रोजी पत्र जारी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली दी २० में :- कमलापूर आणि पातानील येथील हत्ती गुजरात येथील जामनगर येथील खासगी एलिफंट पार्कला हलविण्याच्या विरोधात आज शुक्रवारी सकाळीं नव ते दहा पर्यन्त भारतीय जनता पार्टी तर्फे आलापल्ली येथील शहीद मास्टे चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्याच्या वतीने तब्बल एक तास वाहतूक रोखून धरल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देवून निवेदन स्वीकारले.

त्यानंतर भाजपा कार्यकत्यांनी आलापल्ली येथील वनविभागाच्या वनसंपदा कार्यालयासमोर ठिया आंदोलनही केले. निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प म्हणुन ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापुर तथा पातानिल येथिल हत्ती त्यांच्या नैसर्गिक वास्तव्याच्या ठिकाणा वरून हजारो किलो मीटर दुर गुजरातला पाठविण्याचे काम आहे तरी सदर हत्ती हलविण्याचे राज्य शासनाचा निर्णय तत्काळ रद्द करावा.

हत्ती मुळे कमलापूर परिसरातील पर्यटन वाढले पर्यायाने रोजगार सुद्धा वाढले आहे सर्व हत्ती नैसर्गिक अधिवासात असून सुदृढ देखील आहेत. कमलापूर जंगल परिसरातील रान म्हशी जावळ सुद्धा आहे येथील जंगल परिसरात नैसर्गिक वातावरणात वन्यप्राण्यांसाठी पोषक वातावरण आहे .त्यामुळे येथिल हत्ती गुजरात सारख्या उष्ण भागात हलविणे चुकीचे आहे .

त्यामुळे हत्तींच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर कमलापूर परिसरातील लोकांना रोजगार पासून मुकावे लागेल. त्याकरीता हत्तींची इथेच सुविधा वाढवून देखभालीसाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमून त्यांना सरंक्षण देण्यात यावे. हत्ती हलविण्याच्या प्रयत्न झाला तर आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशाराही निवेदनातुन देण्यात आला आहे.

हे देखील वाचा,

इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांच्या 350 फुट पुतळ्याची प्रतिकृतीची तयार, धनंजय मुंडेंनी केली पाहणी

Comments are closed.