Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दगडूशेठ गणपती ला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; किरणोत्सव सोहळ्यात सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सूर्यकिरणांचा गाभा-यात प्रवेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुणे डेस्क, दि. ११ फेब्रुवारी : धार्मिक कार्यक्रमांनी गणेशभक्तांतर्फे करण्यात येणा-या अभिषेक व पूजा-अर्चनेप्रमाणे शुक्रवारी दगडूशेठ गणपती बाप्पांना चक्क सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि जय गणेश…जय गणेशचा जयघोष झाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभा-यात प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शुक्रवारी सकाळी उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभविला. सकाळी ८ वाजून २५ मिनीटे ते ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला. श्रीं च्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या चांदीच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणांनी स्पर्श केला.

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, गेले तीन दिवस दररोज सकाळी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडत आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने ही किरणे मूर्तीवर पडतात. मंदिराची रचना पूर्वाभिमुख व उंच असल्याने गाभा-यात सूर्यकिरणांचा यावेळी प्रवेश होतो. माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा दरवर्षी अनुभवायला मिळतो. त्यामुळे भाविकांना हा सोहळा गणेशजयंतीनंतर एका आठवडयामध्येच अनुभवता आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना शुक्रवारी सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. सकाळी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि जय गणेश… असा जयघोष झाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभा-यात प्रवेश करीत हा महाभिषेक केला.

हे देखील वाचा  : 

सी आय एस एफ जवानांचा अपघातात दुर्दवी मृत्यू

अट्टल चोरी करणाऱ्या चोराला पोलीस पकडायला गेले असता चोरांचा संशयास्पद मृत्यु…

चंद्रपूरचा ‘सारंग बोबडे’ फोर्ब्सच्या यादीत

 

Comments are closed.