देवेंद्र फडणवीस त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठं झालेलं पाहायचंय- संजय राऊत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क :– देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एका आहेत. राजकारणातील एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर काम करताना आणि मोठं झालेलं पाहायचंय, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.
ऐका मुलाखतीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले. देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. राजकारणात कोणीही एकमेकांचा शत्रू नसतो. आमच्यात केवळ वैचारिक मतभेद आहेत. राजकीय विरोधकांमध्ये चांगले संबंध असणे ही महाराष्ट्राची आजपर्यंतची परंपरा आहे. एकेकाळी शरद पवार हे आमच्याविरोधात होते. तरीही मी त्यांना भेटायचो. यावर अनेकजण आक्षेपही घ्यायचे. मात्र, इतकी वर्षे राजकारणात असणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या नेत्याला भेटणे गरजेचे आहे. त्यांचे म्हणणे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे वेळ मिळाल्यावर मी सगळ्याच राजकीय नेत्यांना भेटत असतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस हे तर राज्याचे मुख्यमंत्री होते, आम्ही पाच वर्षे त्यांच्यासोबत काम केले आहे. ते भाजपचा तरुण चेहरा आणि प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. आम्हाला भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर मोठे झालेले पाहायचे आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. आम्ही आमचे राजकारण करत राहणार, ते त्यांचे राजकारण पुढे नेतील. या सगळ्यातून एकमेकांना विरोध होणे क्रमप्राप्त आहे, पण म्हणून लगेच तलवार काढायची नसते, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
Comments are closed.