देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी निवड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमताच्या जोरावर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणुन निवड झालेली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३७ जागा मिळून स्पष्ट् बहुमत मिळालेले असून भाजपला १३२ जागावर विजय मिळाला आहे. त्यामुळे महायुती कडून भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आल्याने तेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झाले आहे. तर महायुतीमधील प्रमुख नेते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झालेली असून एक महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानीवर पार पडली. या बैठकीनंतर आता राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी महायुतीचे हे तिन्ही नेते राजभवनावर दाखल झालेले आहेत.
Comments are closed.