भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड.
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड. सुधीर मुनगंटीवार यांनी नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला रविंद्र चव्हाण यांनी अनुमोदन दिले. केंद्रीय निरीक्षक निर्मला सितारामन आणि विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड.
पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील.
ही बैठक संपल्यानंतर विधानसभवनातच भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीला भाजपाचे सर्व 132 आमदार उपस्थित होते. तसेच भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांचाही या बैठकीत समावेश होता. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपाच्या नेतेपदासाठी शिक्कामोर्तब झाल्यानंतर विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव गटनेतेपदासाठी ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले.
राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची शपथविधी पार पडणार आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आता 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील.
Comments are closed.