Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘जय भीम’ चित्रपटातील दृश्यावरुन वाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई डेस्क दि,०३ नोव्हेंबर : ‘जय भीम’ सिनेमा अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. प्रकाश राज आणि सूर्या यांचा हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. आदिवासी लोकांवर होणाऱ्या अन्यायावर हा चित्रपट भाष्य करतो. हा तमिळ सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटातील एका दृश्यावर सोशल मीडियावर चांगलाच वाद निर्माण झाला आहे

चित्रपटातील एका दृश्यात अभिनेता प्रकाश राज एका व्यक्तीच्या कानाखाली मारतात. त्यावेळी समोरचा व्यक्ती हिंदी भाषेत “मला का मारले” असे विचारतो. त्यावर प्रकाश राज म्हणतात,”तु हिंदीत का बोललास तमिळ भाषेत बोल”. असे म्हणत ते त्या व्यक्तीला चांगलाच दम देतात. चित्रपटातील हा सीन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चित्रपटाचे कथानक काय आहे ?

आदिवासी समाजातील पुरुषांना जबरदस्तीने पोलीस एका ठिकाणी घेऊन जातात. तिथे त्यांचा अतोनात छळ करण्यात येतो. पोलीस त्यांना न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यास सांगतात. त्या आदिवासींपैकी एक म्हणजे राजकानू. ज्याची पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी चंद्रू नावाच्या वकिलाची मदत घेते. चंद्रू मानवाधिकार प्रकरणांवर विशेष लक्ष देतो. पण या प्रकरणाचा तळ गाठताना कोणते घृणास्पद सत्य समोर येते, ही या चित्रपटाची कथा आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

सिपेट प्रकल्प नाशिकमध्ये होणार; हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार!

सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्न पदार्थ मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग घेणार विशेष खबरदारी

सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक

Comments are closed.