Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी तालुक्यातील पूरपिडितांना धान्य, ब्लँकेट्सचे वाटप.

संकट काळात धावून आले मैत्री परिवार संस्था व आ. प्रवीण दटके.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 16 जुलै :-  अहेरी तालुक्यातील नद्यांना आलेल्या पुरामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या पुरामुळे घरादाराची नासधूस झाली असून, अशा वेळी जनसंघर्ष समिती,याभागात दौरा केला व तेथील परिस्तिथी चा आढावा घेऊन नागपुरात मदतीचे आव्हान केले तेव्हा मैत्री परिवार व आ. प्रवीण दटके यांनी या भागातील नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.
गेल्या दहा-पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गडिचरोली जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे, नदी काठावरील गावांना पुराचा वेढा बसला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे अहेरी तालुक्यात प्राणहिता नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील नदीकाठावर असलेल्या अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्याअनुषंगाने अहेरी तहसिल प्रशासन व पोलीसांनी मिळून या गावातील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून येथील समाज कल्याण शाळा व एकलव्य शाळांमध्ये स्थानांतरिक केले आहे. त्यात वांगेपल्ली, महागाव खुर्द, मुत्तापूर, चिंतलपेव, वडलापेठ, अबनपल्ली या गावांचा समावेश आहे. गावातील लहान मुले, महिला, वयोवृद्धांच्या खाण्यापिण्यची व्यवस्था करण्यात आली असून, पावसामुळे वाढलेल्या गारठ्यापासून संरक्षण म्हणून ब्लँकेंट्सची गरज होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तहसिलदारांच्या विनंतीवरून मैत्री परिवार नागपूरच्या गडचिरोली शाखेने ५००च्या जवळपास ब्लँकेंट्सचे वाटप केले आहे. यासोबतच सकाळी बोरी क्षेत्रातील नदी काठच्या ओडूगुडम या गावातील नागरिकांनाही रामपूर येथील शाळेत हलविण्यात आले असून, त्यांना ७० ब्लँकेट्स व एक क्विंटर तांदूळ पाठविण्यात आले आहे. जनसंघर्ष समितीचे कार्यकर्ते पुरपरिस्थितीचा आढावा घेत असून मैत्री परिवार, आ. प्रवीण दटके व जनसंघर्ष समितीच्या आणि श्रीराम सेवा समिती च्या वतीने या भागात मदतकार्य केले जात आहे.
याकार्यासाठी विशेष परिश्रम रवि नेलकूद्री ,मूकेश नामेवार ,संतोष मद्दीवार , प्रशांत नामेवार ,विकास उईके ,संजय पोहणेकर , विनोद जिल्लेवार , प्रशांत ढोंगे , श्रीकांत नामनवार , अक्षय संतोषवार , देवेंद्र खतवार, गूड्डू ठाकरे , नागराज नामेवार , प्रशांत शेंडे इत्यादी करीत आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोलीत महा भयावह विदारक पूरस्थिती ….

महाराष्ट्रातील ठळक चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आपले चॅनेल सबक्राईब करा 👍🏻लाईक करा,शेअर करा व 🔔बटण दाबा.*

चातगाव वनपरिक्षेत्रातील रानडुकराची शिकार प्रकरण…वन विभागाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या..
https://loksparsh.com/maharashtra/three-accused-arrested-in-poaching-case-in-dhundeshiwani/27584/

Comments are closed.