Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट

अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार सरसकट ५ हजार रूपये -  उपाध्यक्ष श्री. शेखर चन्ने यांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • राज्य सरकारकडून मिळाली ४५ कोटींची मदत

मुंबई, दि. १९ ऑक्टोबर, २०२२ – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीची भेट दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने यांनी दिली. या निर्णयाचा फायदा सुमारे ८७ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी वर्गाला होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येणार आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही श्री. चन्ने यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वृध्दाची फसवणूक करत हात चलाखी ने एटीएम मधून पैसे लंपास

मुंबईत तीन ठिकाणी बाॅम्बस्फोट करण्याची धमकीचा निनावी फोन

 

Comments are closed.