Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु निवासस्थानाच्या वीज बिल वापरात डॉ सुहास पेडणेकर यांची आघाडी

वीजेचे बिल लाखोंच्या घरात ,सर्वाधिक बिल डॉ पेडणेकर यांच्या नावे,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

मुबई डेस्क १४ फेब्रुवारी :  मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या कालिना येथील निवासस्थानाचे वीज बिल लाखोंच्या घरात येत असून मागील ११ वर्षात एकूण २५,२५,२७२ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली आहे तर एकूण बिलाच्या निम्म्याहून अधिक बिल हे विद्यमान कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर यांचे असून मागील ४ वर्षाचे त्यांनी १३  लाखांची वीज वापरली आहे. मागील 3 कुलगुरुच्या तुलनेत वीज बिल वापरात डॉ सुहास पेडणेकर यांची आघाडी आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या निवासस्थानी वापरण्यात आलेल्या विजेच्या बिलाची आणि अन्य माहिती विचारली होती. मुंबई विद्यापीठाने अनिल गलगली यांस वर्ष 2011 पासून 2021 या 11 वर्षातील वीज बिलाची आकडेवारी दिली. मागील ११ वर्षात २५,२५,२७२ रुपये वीज बिलावर खर्च झाले आहेत. या ११ वर्षात डॉ राजन वेळूकर, डॉ संजय देशमुख आणि डॉ सुहास पेडणेकर असे ३  कुलगुरु मुंबई विद्यापीठास लाभले. डॉ वेळूकर आणि डॉ देशमुख यांचा ७  वर्षाच्या कार्यकाळात जितक्या रक्कमेची वीज वापरली गेली त्याहून अधिक रक्कमेची वीज मागील ४  वर्षात डॉ सुहास पेडणेकर हे वापरत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डॉ वेळूकर आणि डॉ देशमुख यांच्या कारकिर्दीत वर्ष २०११ मध्ये १.५१ लाख, वर्ष २०१२ मध्ये १.५४  लाख, वर्ष २०१३ मध्ये १.८२  लाख, वर्ष २०१४ मध्ये २.४२  लाख, वर्ष २०१५  मध्ये १.७१ लाख, वर्ष २०१६ मध्ये १२.६६  लाख तर वर्ष २०१७ मध्ये १.८९  लाख अशी रक्कम अदा करण्यात आली आहे. तर डॉ सुहास पेडणेकर यांनी सर्व विक्रम मोडले आहेत. वर्ष २०१८  मध्ये ३.३९ लाख, वर्ष २०१९  मध्ये २.२२  लाख, वर्ष २०२०  मध्ये ५.५५  लाख आणि वर्ष  २०२१  मध्ये १.८९  लाख रुपयांची वीज वापरली आहे. डॉ सुहास पेडणेकर यांनी फक्त ४  वर्षात १३  लाखांची वीज वापरली आहे तर डॉ वेळूकर आणि डॉ देशमुख यांनी ७  वर्षात १  लाखांची वीज वापरली आहे.

अनिल गलगली यांच्या मते निवासस्थान आणि सुविधा जरी दिल्या असल्या तरी वीज जपून वापरली जाणे अपेक्षित आहे. पगाराच्या तुलनेत सुविधांवर खर्च अधिक होत असून यावर बंधन नसले असले तरी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून अश्या सुविधांचा वापर काटकसरीने करणे योग्य राहील.
[

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील  वाचा ,

पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढ़ल्याने वनविभागात उडाली खळबळ..

मंत्र्यांच्या बंगल्यांना आता किल्ल्यांची नावं – ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Comments are closed.