Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अठरा महिन्याची “आर्वी” एम.पी.एस.सी. परिक्षेतील फटाफट देते उत्तरे…!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

प्रत्येक आई-वडिलांना त्यांचा मुलगा किंवा मुलगी प्रत्येक गोष्टीत हुशार हवा असतो….मात्र, त्याची जेवढी क्षमता आहे तो त्यानुसार आपलं भविष्य घडवत असतो. आजच्या जगात नुसतं अभ्यासात हुशार असून चालत नाही तर इतर गोष्टीतही तो तल्लख असणं गरजेचं आहे…त्यासाठी खास करुन आई कायम चिंतेत असते…परंतु अकोल्यातील फक्त 18 महिन्याच्या मुलीने चक्क आपल्या आई वडिलांची ही चिंताच दुर केली आहे…ही मुलगी फक्त 18 महिन्याची असुन विचारलेल्या प्रश्नाचे पटापट उत्तर देते तिला एमपीएससी मध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं एका क्षणात सांगते…हे ऐकून कुणालाही नवल वाटेल परंतु हे सत्य आहे…

 

अकोला दि,२० मार्च : कु.आर्वी सोनल अरून राऊत असे तिचे नाव असुन ती फक्त 18 महिन्याची आहे.अकोला येथील शिवनी येथे राहत असलेली कु. आर्वी चा जन्म 18 जून 2020 ला झाला आहे. आई सोनल राऊत असुन शिक्षण एम.ऐ. पर्यंत झाले आहे आणि मागील चार वर्षांपासून जुनियर काॅलेजला लेक्चरशिप करीत आहेत तर वडील अरून राऊत हे इंजिनीयर आहेत. सध्या ते पुणे येथे नौकरी करण्याठी राहत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

18 महिन्याची मुलगी कु.आर्वी ही एवढ्या कमी वयातच इंग्रजी,मराठी मुळाक्षरे अगदी तोंडपाठ सांगते. ऐकतच नाही तर शरीराचे सर्व अवयवाची नावे,रंगांची ओळख, प्राणी, पशुपक्षी, फुले, फळे या सगळ्यांची ओळख व नावे फटाफट सांगते…कोणत्याही वस्तूचे, नावाचे स्पेलींग वाचते आणि इंग्रजी स्पेलिंग सह अगदी बरोबर सांगते…आश्चर्य करणारी गोष्ट म्हणजे आर्वी जनरल नॉलेज प्रश्नांची अगदी तोंडपाठ उत्तरे देते हे पाहिल्यानंतर सर्वांची आश्चर्याने तोंडात बोट गेल्याशिवाय राहणार नाही तीच्या घरातीलच नाही तर नातेवाईक शेजारील आणि बघणारे तिचे कौतुकच करीत आहेत.!

हे देखील वाचा ,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चवदार तळ्यावर जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू, भंते,, आंबेडकर अनुयायींची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी.

खांडक्या’च्या नगरीत गुंड परप्रांतीयांचे साम्राज्य !

 

 

Comments are closed.