Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर… तीन जणांचा बळी घेणारा वाघ p-2 जेरबंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
 नागभीड आणि ब्रह्मपुरी तालुक्यात तीन जणांचे बळी घेणारा व एका महिलेला गंभीर जखमी करणारा वाघ जेरबंद करण्यात वन विभागाच्या विशेष पथकाला यश प्राप्त झाले आहे. म्हसली परिसरातील जंगलात  P-2 या वाघाला जेरबंद करण्यासाठी राबविली होती विशेष मोहीम शेवटी  आज दुपारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी अचूक डार्ट मारून वाघाला केले बेशुद्ध, या भागात ऐन पीक काढणीच्या काळात या वाघाच्या दहशतीने ग्रामस्थ होते भयग्रस्त झाले होते, अखेर वाघाला जेरबंद करून प्राथमिक वैद्यकीय तपासणीसाठी चंद्रपुरात केले रवाना करण्यात आले आहे.

चंद्रपूर दि, ०३ डिसेंबर : जिल्हातील नागभिड आणि ब्रम्हपूरी तालुक्यात धुमाकूळ घालणारा पट्टेदार नर जातीचा वाघाला आज शनिवारी (०३ डिसेंबर) ला दुपारच्या सुमारास नागभिड वनपरिक्षेत्रातील मिंडाला उपवनक्षेत्रातील मसली नियत क्षेत्रात वाघाला पथकाने डार्ट मारून बेशुध्द होताच पिंजऱ्यात जेरबंद केले. पी 2 वाघाने नागभीड तालुक्यातील ढोरपा, पाहण, पान्होडी या गावातील दीड महिन्यात चार जणांचा बळी घेतला होता. त्यामूळे शेतकऱ्यांनी वाघाला जेरबंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार ब्रम्हपूरी व नागभिड तालुक्यात बरेच दिवसांपासून नर जातीचा पट्टेदार वाघाने (पिट 2) नागभीड तालुक्यातील पाहाण येथील वनिता वासुदेव कुंभरे (पाहण) ही महिला शेतात गवत आणण्यासाठी गेली असता तिच्या हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर ढोरपा जवळ असलेल्या टेकरी या शेतशिवारात तोरगांव येथील वाघाच्या हल्यात महिला ठार झाली होती. तर याच आठवड्यात ढोरपा येथील सविता भुरले या महिलेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्या अगोदर पान्होडी येथील गुराख्यास वाघाने ठार केले होते. त्यामुळे इरव्हा (टेकरी), मौशी, ढोरपा, पाहण, पान्होडी या परिसरात वाघाची चांगली दहशत पसरली होती.

शेतकरी शेतमजूर व नागरिकांच्या जिवाकरीता पट्टेदार वाघापासून धोका निर्माण झाल्याने डार्ट मारून जेरबंद करण्यचे आदेश नागपूरचे मुख्य वन्यजिव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (जीव) यांनी दिला होता. तेव्हा पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सशस्त्र पोलिस अजय मराठे व पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत तुपकर वाघावर पाळत ठेवून होते आणि आज मसली परिसरातील जंगलात  P-2 या वाघाला जेरबंद करण्यासाठी राबविली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वन विभागाच्या अथक परिश्रमानंतर शेवटी आज दुपारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी अचूक डार्ट मारून वाघाला केले बेशुद्ध, करून वाघाला जेरबंद केलं .p-2 या वाघांच्या भीतीपोटी गावातील ग्रामस्थ पीक काढणीच्या काळात या वाघाच्या दहशतीने भयभीत झाले होते.अखेर वाघाला जेरबंद करून केल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला असून पी टू या वाघाला वैद्यकीय तपासणीसाठी चंद्रपूर कडे रवाना करण्यात आला आहे.

Comments are closed.