Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी ट्विट करत करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली.त्यांनी सांगितले कि ”लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी.  सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Comments are closed.