Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चीचडोह प्रकल्पात चार युवकांचा पाण्यात बुडू मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,१४ : चामोर्शी तालुक्यापासून पाच किमी अंतरावर असलेल्या चीचडोह प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा खोलगट पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना आज रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली आहे.

मोनु त्रिलोक शर्मा (26) रा.गडचिरोली, प्रफुल विठ्ठल येलुरे (20), शुभम रुपचंद लांजेवार (24), महेश मधुकर घोंगडे ( 20 ) सर्व राहणार कृषक हायस्कूल जवळ चामोर्शी येथील मृतकांचे नाव आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीनुसार, सदर पाच  युवक चीचडोह प्रकल्पात रमत गमत फिरायला गेले होते. दरम्यान प्रकल्पात असलेल्या पाण्याला पाहून त्या युवकांना पोहण्याचा मोह आवरला नसल्याने प्रकल्पाच्या  पाण्यात उतरले माञ अशातच पाच हि  युवकाना खोलगट पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्यातील चार युवकाच पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून यातील एक मित्र पाण्यातून कसाबसा आपला जीव वाचविला आहे .

सदर घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस विभाग , बचाव पथक घटनास्थळ गाठून रस्सी दोरखंड बांधून खोल पाण्यात उड्या घेवून तब्बल तास भर शोधमोहीम राबविली असता चारही युवकांचे मृतदेह  आढळून येताच त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी स्थानिक नागरिकांसह पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर साठे, पी एस आय तुषार पाटील व इतर पुलिस कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.