गडचिरोलीत गेल्या चोवीस तासात 48 बाधित तर 63 कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली ५ डिसेंबर :- गडचिरोलीत गेल्या चोवीस तासात जिल्हयात 48 नवीन बाधित आढळून आले तसेच 63 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8188 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7664 वर पोहचली. तसेच सद्या 439 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 85 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.6 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5.36 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.
नवीन 48 बाधितांमध्ये गडचिरोली 22, अहेरी 3, आरमोरी 8, भामरागड 1, चामोर्शी 1, धानोरा 3, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 2, मुलचेरा 2, सिरोंचा 1 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 63 रूग्णांमध्ये गडचिरोली 35, अहेरी 9, आरमोरी 3, भामरागड 4, चामोर्शी 5, धानोरा 2, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 2 व वडसा मधील 3 जणाचा समावेश आहे.
एकूण नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील गोकूळनगर 3, इतर जिल्हा 1, शहरातील इतर 1, बाजाजी शोरूम जवळ 2, कन्नमवार वार्ड 3, मेडिकल कॉलनी 1, नवेगाव 1, आरटीओ कार्यालय 1 जवळ, रामपुरी वार्ड 1, रेव्हून्यू कॉलनी 1, सर्वोदया वार्ड 1, शाहू नगर 1, शिवनी 1, वनश्री कॉलनी 1, विहिरगाव 1, विसापूर 1, विवेकानंदनगर 1 जणांचा समावेश आहे. अहेरीमध्ये शहरातील स्वयंम अपार्टमेंट 1 व इतर शहरातील 2 जण आहेत. आरमोरीमध्ये सर्व स्थानिक आहेत. भामरागड हितापडी येथील आहे. चामोर्शी तील 1 जण स्थानिक आहे. धानोरा मधील 1 शहरातील , हीरंगे 1 व 1 जेवाळवाही चा आहे. एटापल्ली 1 जण स्थानिक आहे. कुरखेडा मधील 1 गुरनोळी चा 1 स्थानिक आहे. मूलचेरा 2 स्थानिक आहेत. सिरोंचा मधील 1 मडीकुंटाचा आहे. वडसा मधील सर्व हनूमान वार्डातील आहेत.
Comments are closed.