Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रखडलेला चेन्ना सिंचन प्रकल्प मार्गी लावा; राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस च्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदनातून केली मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी, दि. ३० मार्च :  राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन अहेरी उपविभागातील प्रलंबित समस्या व विकास कामाबाबत सविस्तरचर्चा करून निवेदन सादर केले.

मुंबई येथील मंत्रालयात आज ३० मार्चला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन अहेरी उपविभागातील मुलचेरा तालुक्यातील रखडलेल्या चेन्ना सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात यावा. सोबतच वेलगुर येथील कालव्याचे काम करून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहेरी उपविभागातील चेन्ना सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करावे. या प्रकल्पाचे बांधकाम अर्धवट स्थितीत थांबविण्यात आले आहे. त्यामुळे येथील पाण्याचा ना शेतीला ना सर्व सामान्य नागरिकांना उपयोग होत नसल्याचे दिसून येते.

या सिंचन प्रकल्पाचे काम केल्यास या भागातील शेतीचा विकास होईल तसेच पाणी टंचाई जाणवणार नाही. भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सखोल नियोजनाची गरज आहे. नद्यांवर लघु धरण बांधावे जेणेकरून नाले व तलावांचे पाणी व्यर्थ जाणार नाही. येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्याप्रमाणे उर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन अहेरी येथे ३३ के. व्ही. सबस्टेशन उभारण्यात यावे अशी मागणी केली. त्यासोबतच ओउद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तासिकातत्वावरील काम करणाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांनी निवेदनातून केली आहे.

हे देखील वाचा : 

आलापल्ली बाजारवाडी येथील चिकन मटण मार्केट येथील अतिक्रमण हटाव व्यावसायिकांच्या विरोधानंतर लांबणीवर

भीषण अपघात! दोन दुचाकीची समोरासमोर धडक, धडकेत तीनजन जखमी

भिवंडीतमधील तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली भेट

 

 

Comments are closed.