Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठात कर्मचाऱ्यांचा क्रिडा महोत्सव होणार साजरा

महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचारी होणार सहभागी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
गडचिरोली, दि. ३० जानेवारी :  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नीत महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे उद्देशाने क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे असा गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटना तसेच चंद्रपूर – गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने  गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे यांचेकडे प्रस्ताव सादर केलेला होता त्यास कुलगुरू डॉ. बोकारे यांनी हिरवी झेंडी दिली असुन २६ आणि २७ फेब्रुवारी २०२२ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या परीसरात हा क्रिडा महोत्सव साजरा होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना आणि गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे आणि प्र-कुलगुरू डाँ. श्रीराम कावळे यांना विद्यापीठाशी संलग्नीत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गोंडवाना विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना चालना देण्याचे उद्देशाने क्रिडा महोत्सवाचे आयोजन करावे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अशी विनंती करण्यात आली होती, महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या विनंती नुसार चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नुकतीच विद्यापीठाच्या सभा कक्षात सभा पार पडली, यावेळी कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डाँ. श्रीराम कावळे यांचेसह विद्यापीठाच्या क्रिडा विभाग प्रमुख डाँ. अनिता लोखंडे, गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, सचिव सतिश पडोळे  महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत रंदई, महासचिव अरूण जुनघरे, कार्याध्यक्ष लोमेश दरडे, महासंघ संघटक विनोद चोपावार, महासंघ प्रतिनिधी विशाल गौरकर आदी  उपस्थित होते.
सभेत झालेल्या चर्चेनुसार कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे यांनी २६ आणि २७ फेब्रुवारी २०२२ रोजी क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यास संमती दिली. त्यामूळे येत्या २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या परीसरात विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. आयोजित क्रिडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नियोजनाची पुर्वतयारी सुरू झाली असुन विविध महाविद्यालयातील २०० आणि विद्यापीठातील १५० असे जवळपास ३५० शिक्षकेत्तर कर्मचारी विविध खेळ आणि सांस्कृतिक कलेचे सादरीकरण करणार आहेत.
विद्यापीठ संलग्नीत महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या क्रिडा महोत्सवाचे आयोजन करणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातले पहीलेच विद्यापीठ ठरल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या क्रिडा महोत्सवात कर्मचारी बंधु भगिनींनी मोठ्या संख्येनी उस्फुर्त सहभागी व्हावे. असे आवाहन दोन्ही संघटनेच्या पदाधिका-यांनी केले आहे.
हे देखील वाचा  :

Comments are closed.