Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“त्या” वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपाल कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया

इतिहासातील नवीन तथ्य माहिती करून घेण्याचे सांगत केली दुहेरी भूमिका स्पष्ट .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

जळगाव, दि. २८ फेब्रुवारी  : औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहे राज्यपाल कोशयारी यांनी माफी मागावी अशी प्रतिक्रिया राज्यभरातुन येत आहे. राज्यपाल भगतसिंग कोशयारी आज जळगावात बोलताना म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे स्तोत्र असून माझ्या माहितीप्रमाणे समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याच माझ्या वाचनात अाल होत. इतिहासातील काही नवीन तथ्य लोकांनी मला सांगितले आहेत. या तथ्यांनुसार मी माहिती घेतो, त्यानंतर पुढे काय करायचं तो निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया जळगावात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बोलतांना दिली आहे. माफि मागण्यांबाबत काय विचार आहे याबाबत विचारणा केली असता त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. व निघुन गेले

औरंगाबादेतील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात संपूर्ण राज्यात राजकीय तसेच इतर संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यपाल कोशियारी यांनी माफी मागावी अशी जोरदार मागणी संघटनांमधील होत असुन ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस तसेच लोकसंघर्ष मोर्चा कडुन काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला. मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

जळगावातील विद्यापीठातील कार्यक्रमात जलतरण तलावाच्या कार्यक्रमास उपस्थिती दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर यु टर्न घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

काय म्हणाले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्रोत आहेत.  मला जेवढी माहिती होती. समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत अस माझ्या वाचनात होतं. मात्र काही लोकांनी मला इतिहासातील नवीन तथ्य सांगितले आहे. ती तथ्य मी पाहतो. असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलतांना म्हणाले.

या प्रतिक्रियेद्वारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जेवढी माहिती होती त्या माहितीनुसार वक्तव्य केल्याच स्पष्ट केल तर तर दुसरीकडे जे इतिहासाती तथ्य माहित नव्हते. ती पाहतो व काय ते ठरवतो असे म्हणत दुहेरी भुमिका स्पष्ट केलीय.

तुम्ही केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याबाबत काय विचार आहे असे राज्यपाल यांना विचारले असता त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. व न बोलता निघून गेले. त्यामुळे राज्यपाल माफी मागतात का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काही लोकांनी मला नवीन माहिती सांगितली असून त्यात काही तथ्य नसून मी याबाबत अधिक माहिती जाणून घेईल. अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी औरंगाबादच्या वक्तव्यानंतर जळगावात दिली आहे.

हे देखील वाचा : 

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे अन्नत्याग आंदोलन

विज्ञानाच्या तत्वांचा अभ्यास करून त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करा – जिल्हाधिकारी संजय मीणा

 

 

Comments are closed.