Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वन विभागाच्या गौरवास्पद कामगिरीचा वन मंत्र्यांच्या हस्ते सन्मान !

शासनाने कार्याची दाखल घेतल्याने समाधान, मात्र सेवेत सामावून घेण्यासाठी अजून किती प्रतीक्षा - डॉ. रविकांत खोब्रागडे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ओमप्रकाश  चुनारकर

चंद्रपूर, दि. १६ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी दिनी चंद्रपूर जिल्ह्यातील वन अधिकारी आणि कर्मचारी यांनी वन्यजीव आणि वनसंरक्षणाचे गौरवास्पद कार्य केल्याबद्दल वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्वातंत्रदिनी चंद्रपूर येथील पोलीस ग्राउंडवर सन्मानित करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या सन्मानाबद्दल मनोगत व्यक्त करताना “शासनाने कार्याची दाखल घेतल्याने समाधान मिळाले,” मात्र १० वर्ष प्रामाणिक सेवा करूनही सेवेत सामावून घेण्यासाठी अजून किती प्रतीक्षा करायची अशी खंत देखील चंद्रपूर जिल्ह्याचे वन्यजीव पशु वैदयकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी व्यक्त केली. 

मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षातून अनेक वेळा हिंस्र प्राण्यांकडून नागरिकांचे जीव घेतले जातात. अशा वेळी संबंधित नरभक्षक, वाघ, बिबट्या, हत्ती किंवा इतर प्राण्याला shoot out चे, म्हणजेच ठार करण्याचे आदेश असतात. महाराष्ट्रात अशा हिंस्त्र प्राण्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र गडचिरोली आणि चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये जवळपास रोजच असा संघर्ष पाहायला मिळतो. परंतु या भागात २०१३ पासून आजपर्यंतच्या कार्यकाळात नरभक्षक प्राण्यांना ठार करण्याचे आदेश असताना एकाही वन्य प्राण्याला ठार न करता आपल्या तांत्रिक कौशल्याच्या आणि अनुभवाच्या जोरावर अशा हिंस्र प्राण्यांना योग्य रित्या जेरबंद करण्यात यश आल्याचे डॉ. रविकांत खोब्रागडे अभिमानाने सांगतात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे प्रत्येक राखीव वन क्षेत्रात स्वतंत्र वन्यजीव पशु वैदयकीय अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे, विशेष म्हणजे २०१३ सलीच अशा पोस्ट मंजूर असून देखील सेवाभरती नियमावली मंजूर न झाल्याने कार्यरत असलेल्या वन्यजीव पशु वैदयकीय अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी म्हंटले आहे.

स्वातंत्रदिनी झालेल्या सन्मान सोहळ्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे वन्यजीव पशु वैदयकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, वनक्षेत्रपाल राहुल अनंतराव कारेकर, एम.पी.तायाडे- क्षेत्र सहाय्यक दुर्गापूर, डी.पी.दहेगावकर- निय्यत क्षेत्र वनरक्षक, दुर्गापूर, ए.एस.पठाण- निय्यत क्षेत्र वनरक्षक बाबूपेठ, डी.बी.चांभारे क्षेत्र सहाय्यक टेम्भूर्ण, एस. व्ही.वेदांती- वनरक्षक, आय.डब्लू.लडके- वनरक्षक, आनंद नेवारे, पशु वैद्यकीय अधिकारी- वरोरा, नंदकिशोर वासुदेव पडवे- क्षेत्र सहाय्यक केळझर, सुभाष मरसकोल्हे- वनरक्षक, अजय मराठे – सशस्त्र पोलीस, अतुल।मोहूले, भोजराज दांडेकर, सुनील ननावरे, अमोल तिखट ( सर्व सदस्य जलद बचाव गट ) यांनी वन्यजीव संरक्षण आणि वन्य सृष्टी वाचवण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली, याबद्दल यांचा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

हे देखील वाचा : 

वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य यात जिल्हा निर्मितीपासून भरीव कामगिरी – जिल्हाधिकारी संजय मीणा

भारतीय संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी हाच खरा स्वातंत्र्य दिन – सुरज पि. दहागावकर 

Comments are closed.