नोकरी चा शोधत असणारे तरुणांसाठी एक आनंदाची बातमी, 12 आणि 13 डिसेंबरला online रोजगार मेळावा.
70 हजार रिक्त पदांसाठी भरती.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, 06 डिसेंबर :- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेक छोटे उद्योग धंदे देखील बंद पडले आहेत. आधीच बेरोजगारी आणि त्यामध्ये कोरोनामुळे आलेल्या संकटानं वाढलेला ताण. अशा परिस्थितीत नोकरी शोधत असतात अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून तिथे आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
12 आणि 13 डिसेंबर रोजी हा ऑनलाइन मेळावा असणार आहे. या मेळाव्यात साधारण 70 हजार रिक्तं पदं भरणार असल्याची माहिती मिळाली आहे. roigar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुक युवक युवतींनी या वेबसाइटवर लॉगइन करून त्यामध्ये आपली माहिती भरायची आहे. 13 डिसेंबरपूर्वी ही माहिती भरणं अत्यंत आवश्यक आहे असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार व उद्योजक मार्गदर्शक केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी केला आहे.

roigar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करा. त्यात आयडी आणि पासवर्ड जनरेट करा. त्यानंतर लॉगइन करून आपली संपूर्ण माहिती तिथे अपलोड करा. त्यानंतर उद्योजकनिहाय रिक्त पदांची माहिती घ्यावी आणि त्यानुसार अर्ज भरावा. आवश्यकता आणि पात्रता ऑनलाइन पद्धतीने नोंदवून पसंतीक्रमांक निवडता येईल. मुलाखतीचं ठिकाण, वेळ, ई-मेल किंवा फोनद्वारे कळवण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन मुलाखत घेण्यात येईल. नक्की या संधी चा उपयोग करा.
Comments are closed.