Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्व.महेंद्र अधिकारी यांच्या कुटुंबीयांकडून निरपेक्ष जन सेवेचे व्रत सुरूच…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागझरी, पालघर/२७ एप्रिल : मरावे परी कीर्तिरूपे उरावे हे स्वामी रामदासांचे बोधवचन स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळेत असल्याचा प्रत्यय येत आहे. महेंद्र अधिकारी यांनी त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात समाजसेवा, सहकार, क्रीडा, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात अतुलनीय कार्य केले. परंतु त्यांच्या कार्याचा वारसा त्यांच्या कुटुंबियांकडून अतिशय प्रामाणिकपणे सुरू नागझरी गावातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेची मोडकळीस आलेल्या व जीर्ण आलेल्या इमारतिच्या जागी स्वर्गीय महेंद्र अधिकारी यांच्या कुटुंबीयांनी नवीन इमारत बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या शाळेच्या बांधकामासाठी अंदाजे ३० लाख रुपये खर्च येणार आहे. आज या शाळेच्या नूतनीकरणाचे भूमीपूजन स्व महेंद्र अधिकारी यांचे बंधू श्री रुपेश रत्नाकर अधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

समर्थ रामदासांचे मरावे परी कीर्ति रूपे उरावे हे बोधवचन आहे. समर्थांनी यातून जगाला अतिशय मोलाचा उपदेश केला आहे. मनुष्य हा केव्हा तरी मरणारच परंतु तरी सुद्धा मनुष्य एकप्रकारे जिवंत राहू शकतो ते म्हणजे त्याने केलेल्या कार्याच्या, त्याच्या कीर्तीच्या रूपाने. असेच सेवाभावी वृत्तीने आणि निरपेक्ष भावनेने स्वर्गीय महेंद्र अधिकारी यांनी त्यांना लाभलेल्या अवघ्या ४९ वर्षांच्या आयुष्यात केले. त्यामुळेच ते केवळ सर्व समाजबांधवांच्या स्मरणातच नव्हे तर हृदयात कायमच राहिले आहेत, आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी हा समाजसेवेचा वारसा पुढे चालवला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नागझरी गावातील जिल्हापरिषदेची शाळा मोडकळीस आली होती त्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी शासकीय निधी आला होता. मात्र या तुटपुंज्या निधीत शाळा दुरुस्त होवु शकत नव्हती. शाळेच्या दुरुस्तीच्या प्रश्नाने शाळेच्या शिक्षकांसह गावातील ग्रामस्थ व पालक चिंतेत होते. परंतु हा प्रश्न जेव्हा रुपेश अधिकारी ह्यांच्या निदर्शनास आला,तेव्हा त्यांनी लागलीच पूर्ण शाळेचे बांधकाम आपण स्वखर्चाने पूर्ण करून देण्याचे सांगितले. शाळा आणि कार्यालयाच्या बांधकामासाठी साधारण ३० लाख रुपये इतका खर्च येणार असून, तो संपूर्ण खर्च स्व.महेंद्र अधिकारी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी करण्याचे निशचित केले आहे. आज या शाळेच्या पुनर्बांधणी कामाचा श्रीगणेशा रुपेश अधिकारी यंच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी ,केंद्र प्रमुख, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. महेंद्र  अधिकारी यांच्या पश्चात सेवेचे व्रत सुरूच...

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

स्व. महेंद्र अधिकारी यांचे दि. 29 एप्रिल रोजी उपचारादरम्यान अकाली निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांनी हाती घेतलेला निस्वार्थ समाजकार्याचा वासा पुढे नेण्यासाठी त्यांचे मित्रपरिवार, कुटुंबीय, आप्तेष्ट व हितचिंतक यांनी जनसेवक महेंद्रजी अधिकारी मेमोरियल ट्रस्ट ची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून रुग्ण,अपघात ग्रस्त,विद्यार्थी व इतर गरजवंताना मानवतेच्या दृष्टिकोनातून
मदत केली जात आहे. गेल्या वर्षभरात अनेक गरजूंना, ते कोणत्याही जाती धर्माचे असोत या ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जात आहे.
तसेच, स्व. महेंद्र अधिकारी यांच्या कुटुंबीयांनी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे नागझरी येथील स्व. नामदेव भाऊ पाटील सभागृह आणि उर्वरित जागा अबाधित ठेवून स्वखर्चाने त्या सभागृहाचे नुतनीकरण करून त्या सभागृहाला वरचा मजला देऊन स्व.महेद्र रत्नाकर अधिकारी यांच्या स्मरणार्थ अद्ययावत दुसरे सभागृह बांधुन देण्याचे जाहीर केले आहे. यासाठी येणारा रुपये पन्नास लाखांपर्यंतचा (५०’०००००) खर्च करण्याची तयारी कुटुंबीयांनी दाखवली आहे. स्व.महेंद्र अधिकारी यांच्या कुटुंबीयांच्या निस्वार्थ दातृत्वामुळेच त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हे देखील वाचा ,

अक्षयतृतीया या दिवशी होणारे बाल विवाह थांबविण्याबाबतचे आवाहन

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर

Comments are closed.