Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विज बिलावर राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी -देवेंद्र फडणवीस.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती डेस्क  22 नोव्हें :- लॉकडाऊन मध्ये आलेली वीज बिल यात सवलत देऊ असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते मात्र यावर त्यांनी लोकांचा विश्वासघात केला तर राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती मध्ये शिक्षक निवडणूक प्रचार दरम्यान राज्य सरकारवर केली,तर हे सरकार घोषणा करते व त्यावर पलटते,लॉकडाऊन मध्ये सवलत देऊ या घोषणा वारंवार सरकारने केल्या तीन कॅबिनेट मंत्र्यांकडून ही घोषणा करण्यात आली असताना आता अभ्यास झाला नाही अस सांगत आहे त्यामुळे हे सरकार लोकविरोधी आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भाजप सरकारच्या काळात 36 हजार कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असल्याचं सांगत त्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारच्या काळात ऊर्जा विभागानं उत्तम काम केल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. आमच्या काळात थकबाकी असेल तर त्याचा अर्थ आम्ही गरीबांना सवलत दिली आहे, असा टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला लगावला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.