Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! माय लेकीला बेदम मारहाण करुन घरातील दागिने, रोकड घेऊन चोरटे झाले पसार..

कल्याणनजीक आटाळी येथील धक्कादायक प्रकार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कल्याण, दि. ८ फेब्रुवारी :  कल्याणनजीक आटाळी येथे राहणाऱ्या दोन महिलांना बेदम मारहाण करुन घरातील दागिने, रोकडची  लूटमार करीत अज्ञात चोरटे फरार झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही महिलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून खडकपाडा पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

कल्याण डोंबिवलीत घरफोडी, वाहन चोरी, चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली आहे. पोलिस अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांंना आळा घालण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहे. अनेक चोरटय़ांना पोलिसांनी बेडय़ा ठोकून त्यांच्याकडून चोरीस गेलेले साहित्य हस्तगत केलेले आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना सुरुच आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कल्याणनजीक आटाळी मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावात राहणाऱ्या वत्सला चिकणो यांच्या शेजाऱ्याने माघी गणेशाची स्थापना केली होती. वत्सला यांची विवाहीत मुलगी सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत वत्सला यांच्या घरी माघी गणपतीला गेली होती. कालरात्री गणेश विसजर्नानांतर आई आणि मुलगी, दोन मुले घरात झोपले होते. मध्यरात्रीस आईची झोप उडाली. तिने दोन लोक घरात शिरलेत अस पाहिलं तिने आरडाओरड सुरु करण्या आधीच तिच्या डोक्यावर चोरटय़ांनी हल्ला केला.

मुलगी सारीका हे पाहून जागी झाली. सारीकाने चोरटय़ांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी या दोघींना मारहाण करुन घरातील १३ तोळे दागिने आणि काही रोकड घेऊन पसार झाले. या घटनेची माहिती खडकपाडा पोलीसांना देण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. खडकपाडा पा्ेलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे. मात्र घरात घूसून दोन महिलांना जखमी करुन लूटमारीच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा :

हिजाबच्या निर्णयाविरुद्ध एल्गार… राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला, युवती रस्त्यावर..

भीषण अपघात: दोन दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक, धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी

धक्कादायक! केंद्र सरकारच्या तिजोरीवर 100 कोटींचा डल्ला?

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.