Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई लोकल येत्या आठवड्यात सर्वांसाठी लोकल प्रवासाचा मुहूर्त ठरणार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

11 आणि 12 डिसेंबरला यासंदर्भातील महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 3 डिसेंबर :- एकीकडे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपासच्या महानगरातील सर्व चाकरमानी मुंबई लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. दिवाळी नंतरच्या आठवड्यांतील कोरोनाबाबतच्या आकड्यांमधला सकारात्मक कल लक्षात घेता प्रशासनाकडून मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण पार पडणार आहे. या बैठकीत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची तारीख निश्चित होऊ शकते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी असणार आहेत. 15 डिसेंबरनंतर सर्वांसाठी लोकलप्रवास खुला करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.”येत्या आठवड्याच्या शेवटी अर्थात 11-12 डिसेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात करोना स्थितीचा आढावा घेऊन लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येईल”, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

यापूर्वीच मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी एबीपी माझाशी बोलतांना सांगितले होते की, “15 डिसेंबरला जर मुंबईत कोरोनाच्या स्थिती बिघडलेली नसेल. आकडे सकारात्मक कल दर्शवत असतील, तर 15 डिसेंबर नंतरच सर्वांसाठी लोकल सुरु करता येणे शक्य आहे.” त्यामुळे आता मुंबईकरांची लोकल प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येऊ शकते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.