Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. २९ जून : मुंबई पोलीस आयुक्तपदी (Mumbai Police Commissinor) विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांची नियुक्ती महाराष्ट्र सरकारने केली आहे. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) हे उद्या निवृत्त होणार असून त्यांच्या जागी आता विवेक फणसाळकर घेणार आहेत. विवेक फणसाळकर याआधी ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.

कोण आहेत विवेक फणसाळकर?

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विवेक फणसाळकर हे १९८९ च्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त पदाची यशस्वी धुरा सांभाळली आहे. ३१ मार्च २०१८ पासून त्यांची ठाणे पोलीस आयुक्तलायात पोलीस आयुक्त पदी नेमणूक झाली होती. त्यांनी जवळपास पावणे दोन वर्ष ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभळला. करोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. कर्तव्य बजावताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना थेट नियुक्ती पत्र देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला होता. त्यांच्या या उपक्रमाचं राज्यभर कौतुक झालं होतं.
विशेष म्हणजे त्यांना मुंबई पोलिस दलात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी विवेक फणसाळकर कसे सांभाळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Breaking news : उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा

 

Comments are closed.