Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आता तयार होणार हवेतून पाणी; मध्य रेल्वेचा अनोखा उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. ३१ ऑगस्ट : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सहा रेल्वे स्थानकांवर आता नव्या तंत्रज्ञानाने पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. या स्थानकांवरील हवेतून पाणी तयार करणाऱ्या यूएन-मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात येणार आहे. अॅटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन (AWG) ‘मेघदूत’ हे एक यंत्र आहे जे कंडेन्सेशन विज्ञान वापरून सभोवतालच्या हवेतून पाणी काढते. हे पाणी आता रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वर्षी जूनमध्ये, युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्टने भारताकडून जल व्यवस्थापनासाठी जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साठी या उपक्रमाला मान्यता दिली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि दादर येथे प्रत्येकी पाच, तर ठाण्यात चार, कुर्ला, घाटकोपर आणि विक्रोळी येथे प्रत्येकी एक किऑस्क उभारण्यात येणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या उपक्रमाचा प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.
प्रवाशांसाठी ठराविक किंमतीत त्यांच्या बाटल्या किंवा कंटेनरसाठी पाणी भरण्याचे केंद्र म्हणून किओस्क वापरण्याची कल्पना आहे. येथे ३०० मिली पाण्यासाठी पाच रुपये, अर्धा लिटरसाठी आठ रुपये आणि एक लिटर पाण्यासाठी १२ रुपये मोजून पाणी घेता येते. याशिवाय, कोणाला गरज असेल तर ते बाटलीने पाणी विकत घेऊ शकतो. या स्थितीत ३०० मिलीसाठी ७ रुपये, ५०० मिलीसाठी १२ रुपये आणि लिटरच्या बाटलीसाठी १५ रुपये मोजावे लागणार आहेत.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम !

हार्बर रेल्वे कोलमडली.

 

Comments are closed.