भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मधील भागीदारी सरकार विकणार आहे. याचा थेट परिणाम LPG गॅसचा वापर करणाऱ्या 7 कोटींपेक्षा अधिक ग्राहकांवर होणार आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 28 नोव्हेंबर: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मधील संपूर्ण भागीदारी सरकार विकणार आहे. यामुळे बीपीसीएल एलपीजी गॅसचा वापर करणाऱ्या 7 कोटींहून जास्त ग्राहकांसमोर सबसिडी बाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला केंद्राने दिलेल्या स्पष्टीकरणातून मिळेल. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी अशी माहिती दिली आहे की, बीपीसीएलचे खाजगीकरण झाल्यानंतरही त्यांच्या ग्राहकांना सबसिडीचा लाभ घेता येणार आहे. सरकार तेल मार्केटिंग कंपन्या इंडियन ऑयल कॉरपोरेशन , बीपीसीएल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड च्या ग्राहकांना सबसिडी देते.
धर्मेंद्र प्रधान यांनी असे सांगितले की, ‘एलपीजी सबसिडीचे पेमेंट सर्व व्हेरिफाइड ग्राहकांना डिजिटल माध्यमातून केले जाते. उपभोक्त्यांना थेट हे पैसे पाठवले जातात. त्यामुळे सर्व्हिसिंग कंपनी खाजगी आहे किंवा सार्वजनिक यामुळे फरक पडत नाही. निर्गुंतवणुकीनंतरही उपभोक्त्यांना एलपीजी सबसिडी आधीप्रमाणेच जारी राहिल.’
सरकार विकणार संपूर्ण भागीदारी
सरकार बीपीसीएलमधील आपला संपूर्ण 53 टक्के हिस्सा व्यवस्थापन नियंत्रणासह विकत आहे. नवीन मालकास भारताच्या तेल शोधन क्षमतेच्या 15.33 टक्के आणि इंधन विपणनाचे 22 टक्के मिळतील. केंद्र सरकार एका घरात अनुदानित दराने प्रत्येक घरात 14.2 किलोचे 12 एलपीजी सिलेंडर (एलपीजी) देते. हे अनुदान थेट वापरकर्त्यांच्या बँक खात्यात दिले जाते. अनुदान आगाऊ दिले जाते आणि ग्राहक एलपीजी रिफिल खरेदी करण्यासाठी त्याचा वापर करतो.
Comments are closed.