विदर्भात पावसाचा अंदाज..पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने परिणाम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती डेस्क २६ नोव्हेंबर :- पश्चिम बंगालच्या उपसागरात निवार नावाचे चक्रीवादळ तयार झाल्यामुळे विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलो आहे. अमरावतीच्या शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर अमरावती, अकोला, बुलढाणा, या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. २७ नोव्हेंबरला चंद्रपूर, यवतमाळ,आणि वाशीम जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू मध्ये वादळ धडकणार असल्याने आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यानाही या वादळाचा मोठा फटका बसणार आहे. या राज्यात देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Comments are closed.