Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघाला मिळणार नवीन जर्सी…

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघाला नवीन जर्सी मिळणार, याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या नवीन जर्सीचा लूक चाहत्यांनी चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या नवीन जर्सीचा लूक कसा असू शकतो, पाहा….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क: ऑस्ट्रेलिच्या दौऱ्यात भारतीय संघाला नवीन जर्सी मिळणार आहे, अशी जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठी नवीन जर्सी बनवलेली आहे. त्यामुळे आता भारतीय संघही या दौऱ्यात नवीन जर्सीसह उतरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. चाहत्यांनी तर या नव्या जर्सीचा फोटोही व्हायरल केलेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारतीय संघ जेव्हा युएईमधून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला होता, तेव्हा त्यांचा नवीन लुक पाहायला मिळाला होता. भारतीय संघातील खेळाडूंनी नवीन जर्सी आणि पीपीई किट्स परीधान केल्याचे पाहिले गेले होते. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारतीय संघ नवीन जर्सीसह उतरणार असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत कोणताही खुलासा बीसीसीआयने आतापर्यंत केलेला नाही. त्यामुळे या गोष्टीबाबत बीसीसीआयने अधिकृत माहिती दिल्यावरच चित्र स्पष्ट होऊ शकते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.