कराड येथील तारळी नदीच्या पुलावर अपघात, मिनीबस 50 फूट खाली कोसळल्याने 5 जण जागीच ठार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सातारा डेस्क :- पुणे ते बँगलोर महामार्ग वरील उंब्रज ता. कराड येथील तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकोनातून ही मिनीबस सुमारे 50 फूट खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिनीबस वाशीवरुन गोव्याकडे निघाली होती. अपघातात तीन पुरुष आणि एक महिला तसेच तीन वर्षांचा मुलगा असे पाच जण जागीच ठार झाले आहेत.
यातील एक जखमी प्रवाशी बाहेर निसटल्याने हा अपघात पोलीस आणि स्थानिक नागरिकांना कळाला. त्यानंतर नागरिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मदत कार्य सुरु केले.
Comments are closed.