Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सातपाटीचे मच्छीमार संतप्त.. लोकप्रतिनिधींना केला गावात येण्यास मज्जाव..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, २४, ऑगस्ट :- शासनाच्या आदेशानुसार दिनांक १५ मे ते १५ ऑगस्ट पर्यंत समुद्रात मासेमारी बंद होती. मात्र मागील काही दिवसांपासून सुसाट वादळ- वारा यामुळे मच्छिमार बांधवांनी आपल्या बोटी समुद्रात नेल्या नाहीत. २ हजार बोटी सातपाटी किनाऱ्यावर उभ्या आहेत. त्यामुळे मच्छिमार बांधवांना या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

लाखो रुपयांचे कर्ज, आणि मच्छिचा दुष्काळ यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे.अत्यल्प प्रमाणात मासेमारी होत असल्याने ५० टक्के मासेमारी बोटी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा गंभीर परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधीची उदासीनता यामुळे मच्छिमार बांधव लोकप्रतिनिधीवर नाराज आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सातपाटी येथील मच्छिमारांच्या दोन सहकारी संस्थांकरिता सुमारे साडेदहा कोटी रुपयांची कर्जाची परतफेड गेल्यावर्षी झालेली नाही. वादळी परिस्थितीत ३० ते ३५ टन वजनाच्या मध्यम बोटी खवळलेल्या समुद्रात तग धरू शकत नाहीत. त्यातच वाढती बोटींची संख्या आणि चोरटी मासेमारी यामुळे मत्स्य व्यवसाय डबघाईला आल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बरडकिन्ही गावाबाहेरुन आवळगांव जाणा-या मुख्य रस्त्याला मोठं मोठे खड्डे..

Comments are closed.