कु.मीनल दिवाकर रामटेके यांची मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी निवड
मीनल यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पुणे, दि. ४ सप्टेंबर : एक कुशाग्र बुद्धीच्या आणि उतुंग व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिमत्त्व असलेल्या कु. मीनल दिवाकर रामटेके या २०१६ साली पुणे विद्यापिठातून ,B.E. Chemical Engineering,MIT College,Pune या महाविद्यालयाच्या माध्यमातून उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. यशाची एक एक कमान चढत त्याची २०१६ सालीच कॉलेज कॅम्पस मधून त्याची Honeywell automation company Pune येथे त्यांची निवड झाली .
सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात GRE TOFFEL ही परीक्षा त्या यशस्वीरित्या उतीर्ण झाल्या. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कु.मीनल दिवाकर रामटेके हीची Northwestern University,USA येथे १६ महिन्याच्या मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट ह्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
मीनल ह्या पॅरामाउंट कॉन्व्हेन्ट BABU PET येथून त्या दहावीच्या शालान्त परीक्षेत द्वितीय क्रमांकाने गुणवंत यादीत आल्या. त्यांचे वडील श्री. दिवाकर जयराम रामटेके यांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन मुलांच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावली. ते डब्लूसीएल येथे कार्यरत आहेत ,आई सौ प्रतिभा दिवाकर रामटेके ह्या गृहिणी आहेत. त्यांनी आपल्या दोन्हीं मुलांवर जीवनात- समाजात कसे वावरावे याचे चांगले संस्कार केले.

विशेष म्हणजे ह्यांचा मुलगा रजत दिवाकर रामटेके हा देखील (BE MECHANICAL ENGINEERING,MIT COLLEGE PUNE ) च्या वतीने Cardiff University येथे २०२१-२२ मध्ये MBA FINANCE ह्या अभ्यासक्रमासाठी इंग्लडला गेलेला आहे , रजत सुद्धा दहावीत PARAMAOUNT CONVENT BABUPETH या शाळेतून शालान्त परीक्षेत प्रथम आला होता.
दोन्ही मुलांना विशेष मार्गदर्शन आई, वडील व हेमंत सुटे ,(परदेश उच्च शिक्षणासाठी नियोजन व तयारी संबधी सल्लागार) यांचे लाभले.
हे देखील वाचा :
Comments are closed.