Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नववधूची पाठवणी सजविलेल्या बैलगाडीतून!

सर्जा राजाच्या साक्षीने नवदाम्पत्याने केली आपल्या सहजीवनाची सुरुवात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नांदेड, दि. ७ फेब्रुवारी : आधुनिकीकरणाच्या काळात लग्नसमारंभात मोठे बदल झाले आहेत. त्या बदलांतही अनेक जण आपली परंपरा जपण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. असाच प्रयत्न नांदेड जिल्ह्यातील बारसगाव येथील शेतकरी कुटुंबियांनी केला आहे. संपूर्ण वऱ्हाडी वधुला आणण्यासाठी चक्क बैलगाडीने गेले आणि लग्नानंतर त्याने आपल्या वधूला लग्नमंडपातून सजविलेल्या बैलगाडीतून आपल्या घरी नेले. या आगळ्यावेगळ्या विवाहाची नांदेड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

नववधूला कोणी बुलेटवरून, कोणी ट्रॅक्टरवरून, तर अगदी हेलिकॉप्टरमधूनही लग्न मंडपातून आपल्या घरापर्यंत घेऊन गेल्याची उदाहरणे आहेत. परंतु, अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरराव बारसे यांच्या मुलगा सुशिल बारसे यांच्या विवाह सोहळा शिवकन्या माधवराव भालेराव हिच्याशी दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी एमशटवाडी येथे पार पडला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी नवरदेवाच्या कुटुंबियांनी आपली रुढी परंपरा जपत वधूला सजविलेल्या बैलगाडीतून सुमारे दहा कि.मी. चा प्रवास करत आपल्या घरी नेले. लग्न प्रवासासाठी लागणारा मोठा खर्च टाळून आपल्या घरच्या लक्ष्मीला पारंपारिक पद्धतीनं घरी आणल्याने बारसे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बदलत्या आणि वेगवान युगात मोठा बदल झाला आहे. वधूची पाठवणी शक्यतो वाहनातून होऊ लागली. अनेक जण लाडक्या वधूला आपल्या घरी नेण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना शोधून काढतात. मात्र बारसे यांच्या कुटुंबीयांनी वधूला आपल्या घरी नेण्यासाठी आलिशान गाडीची निवड न करता आपले वडील शेतकरी असल्याचा अभिमान बाळगत बैलगाडीची निवड केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सायंकाळी पाच वाजता सजविलेल्या बैलगाडीतून वधूला बैलगाडीत आलिशान खुर्चीत बसवून स्वतः बैलांचा कासरा हातात धरत सर्जा-राजाच्या साक्षीने एमशेटवाडी ते बारसगाव असा १० कि.मी. चा प्रवास केला. या वधूवरांचे अनेकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. अनेकांनी हे क्षण शुटिंग करत मोबाइलच्या कॅमेरात टिपले.

हे देखील वाचा : 

धक्कादायक ! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अनैतिक संबंधातून महिला करायची ब्लॅकमेल

धारदार शस्त्र व कोयत्यांचा नंगा नाच करणाऱ्या तडीपार गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

मोठी बातमी : गॅस गिझर लिक झाल्याने महिला पायलटचा मृत्यू

 

 

 

 

Comments are closed.