Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

खोलापूर पोलिसात गुन्हा दाखल. अमरावतीत अल्पवयीन असुरक्षित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अमरावती, दि. ११ फेब्रुवारी : अमरावतीत अल्पवयीन अद्यापही असुरक्षित असल्याचं समोर आले आहे. नुकताच भातकुली तालुक्यातील खोलापूर पोलिस स्टेशन अंतर्गत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे यातून अल्पवयीन गर्भवती असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपी अभिजीत हूले यांनी संधी साधून पीडित तिच्या घरात जाऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला उपचारार्थ खासगी रुग्णालयात नेले असताना, हा प्रकार उघडकीस आला आहे. खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी पीडित यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. यासंदर्भात अधिक तपास खोलापूर पोलिस करत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या वर्षी पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीमध्ये अमरावतीच्या ग्रामीण भागात सन २०२० – २१ मध्ये १९ अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. तर ७४ विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद पोलिसात दाखल आहे. चालू वर्षाचा महिना लुटताना पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटना पुढे येत असल्याने अमरावतीत अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा समोर आला आहे. अमरावती जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला असून महिला राज अमरावती मध्ये असताना महिला कितपत सुरक्षित आहेत याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अट्टल चोरी करणाऱ्या चोराला पोलीस पकडायला गेले असता चोरांचाच संशयास्पद मृत्यु…

दगडूशेठ गणपती ला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’

सी आय एस एफ जवानांचा अपघातात दुर्दवी मृत्यू

 

Comments are closed.