धान उत्पादकांना 700 रुपये प्रति क्विंटल प्रोत्साहन- राज्य सरकार
या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होईल.
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल 700 रुपये देण्याच्या निर्णयाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २५ नोव्हेंबर :- धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल 700 रुपये देण्याच्या निर्णय मंगळवारी घेण्यात आला. तसेच, येत्या शुक्रवारवासून 27 नोव्हेंबर कापूस खरेदी केंद्रे सरु करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे वैद्यकीय महाविद्यालय असे विविध प्रकारचे निर्णय मंगळवारी घेण्यात आले. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे सर्व निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या निर्णयांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 1400 कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च येईल.
खरीप हंगाम 2020-21 साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत साधारण 1868 रुपये ठरवली होती. ग्रेड धानासाठी ती 1888 रुपये इतकी निश्चित करण्यात आली. मात्र, धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनपर राशी देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु होता. त्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे प्रोत्साहनपर 700 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. केवळ ऑनलाईन खरेदी होणाऱ्या धानासाठीच ही प्रोत्साहनपर रक्कम मिळेल. या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी धान खरेदी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Comments are closed.