Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विज्ञानाच्या तत्वांचा अभ्यास करून त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करा – जिल्हाधिकारी संजय मीणा

जवाहरलाल नेहरु नगर परिषद शाळा रामनगर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २८ फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमधील विज्ञान विषयक सुप्त कल्पनांना व्यासपीठ मिळावे याद्रुष्टीने जवाहरलाल नेहरू न.प. उच्च प्राथमिक शाळा रामनगर येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संजय मीणा, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आशिष येरेकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रशासक नगर परिषद गडचिरोली, विशाल वाघ, मुख्य अधिकारी, नगर परिषद गडचिरोली हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी सहभागी विद्यार्थ्यांकडून सादर केलेल्या प्रयोगाची माहिती जाणून घेतली व सोबतच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोबतच मानवी आंतर इंद्रीयांच्या विद्यार्थी व शिक्षकांनी काढलेल्या रांगोळ्या, सायन्स वाल याचे अवलोकन केले. विज्ञान प्रदर्शनात नगर परिषदेच्या रामपूर, लांजेडा, इंदिरा गांधी, शिवाजी शाळा येथील विद्यार्थी सहभागी झालेत. या प्रदर्शनात एकुण 75 विज्ञान प्रतीक्रुती सादर करण्यात आल्या. सोबतच वैज्ञानिकांचे जीवन परिचय प्रदर्शन, विज्ञान प्रेक्षागृहात वैज्ञानिकांच्या जीवनावर आधारित चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याव्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प. उच्च प्राथमिक शाळा संकुल येथे सुध्दा मा. आशिष येरेकर, सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे हस्ते विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी विसापूर, गोकुळनगर, राजीव गांधी, महात्मा गांधी या शाळेचे विद्यार्थी सहभागी झालेत. एकंदर नगर परिषद शाळांचे 1700 विद्यार्थी सहभागी झालेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या विज्ञान प्रदर्शनाला गडचिरोली शहरातील नागरिकांनी भेट देऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मा. विशाल वाघ, मुख्य अधिकारी यांचे मार्गदर्शनात शिक्षण विभाग प्रमुख बंडू ताकसांडे, केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक सुधीर गोहणे, इतर शाळांचे मुख्याध्यापक कांतीलाल साखरे, रवी उईके, उत्तम पटले, राजेश दरेकर, मंगला मेश्राम, सुमित्रा काळे, प्रतीभा साळवे, नयना चन्नावार, माधुरी म्हस्के जवाहरलाल नेहरु शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा संकुलचे शिक्षक, इतर नगर परिषद शाळांचे सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा : 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.