Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सूरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या ट्रॅक ने पुनः घेतला एकाचा बळी..

मृतकाचे नाव वासुदेव मंगा कुळमेथे असून नागेपल्ली येथील रहिवासी असून शासकीय आश्रम शाळेत शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क

आलापल्ली, 20 मे –  सूरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रॅक ने पुनः  एका शिक्षकाचा बळी घेतला आहे. मृत शिक्षकाचे नाव वासुदेव मंगा कुलमेथे (५०) असून सदर घटना पोलीस चौकी आलापल्ली समोर घडली आहे.

मुळचे मुलचेरा तालुक्यातील गोमनी येथील रहिवासी होते . भगवंतराव आश्रम शाळा  काटेपल्ली येथे कार्यरत असल्याने अल्लापल्ली मध्यस्थी गाव असल्याने नव्याने घर बांधकाम करून नागेपल्ली येथे स्थायी झाले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रोजच्या प्रमाणे आपले कर्तव्य शाळेत बजावून आज शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास काटेपल्ली येथील भगवंतराव आश्रम शाळेतून आपल्या दुचाकीने अल्लापल्ली येथे आले . दरम्यान चंद्रपूर मार्गावरील अल्लापल्ली पोलीस चौकी समोरून जात असताना  दुसऱ्या दुचाकी ला धडक दिली असता वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मागून येणाऱ्या लोह खनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाले. 

सुरजागड  प्रकल्पामधून दैनंदिन लोहखनिजाची वाहतूक शेकडो ट्रकातून होत आहे. ट्रक चालक ही बेदारकपणे ट्रक चालवत असल्याने अपघातात वाढ झाली आहे . याशिवाय दैनंदिन जड वाहतुकीने रस्त्याची चाळण झालेली आहे. दुचाकी, चार चाकी चालकांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. अशातच सुरजागड प्रकल्पातील लोहो खनिज वाहतूक करणारे ट्रकचालक ट्रक बेधारकपणे चालवत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मागील आठवड्यात आष्ठी येथे बारा वर्षीय मुलीचा ट्रकच्या अपघातात चिरडून मृत्यू झाला असतानाच दुसरा अपघात वरदडीच्या ठिकाणी आलापल्ली या ठिकाणी झाल्याने नागरीक  रस्त्यावर आले असुन व्यापारी संघटनेच्या मदतीने आलापल्ली शहरातील बाजारपेठे बंद करून सुरजागड प्रकल्पाचा निषेध करीत लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकाने आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Comments are closed.