Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिला डॉक्टरवरिल हल्लेखोर (हॅमर मॅन) अखेर पोलिसांच्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. ९ फेब्रुवारी : भाइंदरमधील महिला डॉक्टर गायत्री श्रीवास्तव यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्या ‘हॅमर मॅन’ ला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कोलकाता येथून अटक केली आहे. हातोडीने हल्ला करून तो नागरिकांना लुटत असल्याने हॅमर मॅन म्हणून कुप्रसिध्द होता.

भाइंदरच्या मुर्धा गावात डॉक्टर गायत्री जैस्वाल यांच्या दवाखान्यात २३ जानेवारी रोजी एका अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला आणि त्यांच्याकडील रोख रक्कम व मौल्यवान ऐवज लुटून तो पळून गेला होता. या हल्ल्यात डॉक्टर गायत्री जखमी झाल्या होत्या. पोलिसांनी हल्लेखोराच्या तपासासाठी विशेष पथकेही बनवली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सीसीटीव्ही चित्रणात हा हल्लेखोर सराईत गुंड राशिद खान असल्याचे निष्पन्न झाले. तो हातोडीने वार करून हल्ला करणारा ‘हॅमर मॅन’ म्हणून कुप्रसिध्द होता. मागील वर्षी मीरा रोड येथील एका वृध्द महिलेवर त्याने अशाच प्रकारे हातोडीने हल्ला करून तिला लुटले होते. त्याला अटक झाल्यानंतर तो जामिनावर सुटला होता. मात्र तो मोबाईल वापरत नसल्याने त्याला पकडणे कठीण झाले होते.

वेगवेगळ्या राज्यात पलायन करून राशिद खान हा पोलिसांना चकमा देत होता. दरम्यान कानपूरला असताना एका विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर त्याने भेट दिली होती. तांत्रिक तपास करणाऱ्या पोलिसांना या हालचालीमुळे लगेच त्याचा आयपी अॅड्रेस मिळाला आणि पोलिसांनी त्याचा माग काढून कोलकाता येथून त्याला अटक केली आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आरोपी राशिद खान याला दुसरे लग्न करायचे होते. त्यासाठी त्याला विवाह विषयक संकेतस्थळावर नोंदणी करायची होती. त्याच्या याच बेसावध हालचालीचा मागोवा घेत, गुन्हे शाखा १ च्या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, पोलीस निरीक्षक राहुल राख, साहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकले, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, नितीन बेंद्रे, अमोल आंबवणे आदींच्या पथकाने या कुप्रसिद्ध ‘हॅमर मॅन’ ला अटक केली आहे.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार! पतीविरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक! एक लाख रुपयांसाठी आईनेच विकले पोटच्या मुलाला  

महापारेषणच्या ४०० केव्ही टॉवर लाईनमध्ये बिघाड

 

Comments are closed.