Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह!

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वाघी- धानोरा शिवारात आढळला बिबट्याचा मृतदेह.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

परभणी, दि. ७ फेब्रुवारी : जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वाघी – धानोरा शिवारात बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून किमान पंधरा दिवसांपूर्वी हा बिबट्या मृत पावला असावा असा अंदाज वन विभागा कडून वर्तविला जात आहे असून बिबटाच्या मृताचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

मागील वर्षी जिंतूर तालुक्यातील वाघी – वडी शिवारात बिबट्याचा अधिवास आढळून आला होता. तर आपल्या पिलांसोबत फिरत असताना बिबटाचे एक पिल्लू वडी शिवारातील एका विहिरीत पडले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजऱ्याद्वारे सदर पिलाची विहिरीतून सुटका करत त्याला इतरत्र हलवले होते. तेव्हापासून आपल्या पिलाच्या शोधात मादी बिबट त्याच परिसरात फिरत असल्याचे अनेकदा शेतकऱ्यांनी पाहिले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर बिबटाची मादी वारंवार त्याच परिसरात दिसत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर मादी बिबट पकडून जंगलात न्यावा या करीता शेतकऱ्यांनी अनेकदा वनविभागाकडे पाठपुरावा केला होता. वनविभागाने सुद्धा अनेक वेळा बिबट पकडण्यासाठी सापळा लावला मात्र प्रत्येकवेळी वनविभागाला अपयश आले होते.

आता सदर बिबटाचा धानोरा येथील शेतकरी अविनाश कालिदास जोशी यांच्या शेतात मृतदेहच सापडल्याने हा नैसर्गिक मृत्यू आहे की एखाद्या शेतकऱ्याने केलेला विषप्रयोग याबाबत वन्यप्रेमींनी मात्र शंका उपस्थित केली आहे. दरम्यान वनपाल गणेश घुगे यांच्यासह डी. जे. कोल्हेवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ गळाकाटू , डॉ चव्हाण यांनी सदर बिबटाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर सदर मृत बिबटाची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती वनपाल गणेश घुगे यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

भोंदू बाबाचा भांडाफोड; जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

“या” शहरातील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार : राज्य सरकारचा मोठा निर्णय

चक्क! मृत कामगाराचा मृतदेह कंपनीच्या गेटसमोर ठेवत कामगारांचे आंदोलन

 

Comments are closed.