Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमेरिका, इग्लंड, जपानचा झेंडा रशियाने काढला, तिरंगा मात्र सही सलामत

रशियाने अमेरिका, ब्रिटन आणि जपानचे ध्वज हटवले, पण आपल्या अंतराळ रॉकेटवर भारतीय तिरंगा कायम ठेवला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नवी दिल्ली, दि. ३ मार्च : जगातील अनेक देश सध्या रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावरून रशियावर अनेक देशांनी निर्बंध लावले आहेत. काल जवळपास १४१ देशांनी रशियाविरोधात निषेध प्रस्ताव मंजूर केला. रशियाला केवळ ५ देशांचे समर्थन मिळाले. मात्र रशियानेही अनेक देशावर निर्बंध घातले आहेत. त्यांनी त्यांच्या रॉकेटवरून अनेक देशाचे झेंडे हटवले आहेत. युक्रेनसोबतचे युद्ध आणि त्यानंतर आलेल्या निर्बंधांदरम्यान रशियाने अमेरिका, ब्रिटन आणि जपानचे ध्वज हटवले, पण आपल्या अंतराळ रॉकेटवर भारतीय तिरंगा कायम ठेवला. तसेच भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्याबाबतही रशियाकडून वेळोवेळी अलर्ट देण्यात येत आहे. बुधवारी पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात याबाबत फोनवरून चर्चाही झाली आहे. त्यामुळे सध्या तरी भारत आणि रशियाच्या संबंधावर युद्धाचा परिणाम झाल्याचे दिसून येत नाहीये.

तिरंगा सही सलामत

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आजची चर्चा रद्द

रशिया युक्रेन युद्धाचा आज आठवा दिवस आहे. या आठ दिवसात साऱ्या जगाने बेचिराख युक्रेन बघितलं आहे. दोन दिवसांपूर्वीच रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसध्ये वाटाघाटीवर चर्चा झाली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने युद्ध सुरुच राहिले. आज पुन्हा या दोन्ही देशात चर्चेची दुसरी फेरी होणार होती. मात्र युक्रेनने रशियाशी चर्चा करण्यास नकार दिल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे हे युद्ध थांबण्याची शक्यताही लांबणीवर गेली आहे. या युद्धात युक्रेनचेही मोठी नुकसान झाली आहे. मात्र रशियाचे 9 हजार सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेन अजूनही झुकलेला नाही.

भारतीयांना घेऊन विमानं येणार

रोमानियामध्ये उपस्थित केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की ८ फ्लाइट आज बुखारेस्टला पोहोचतील आणि सुमारे १८०० नागरिकांना भारतात घेऊन जातील. काल बुखारेस्ट येथून सुमारे १३०० नागरिकांना घेऊन ६ उड्डाणे निघाली. सिंधिया म्हणाले, आता मी बॉर्डर पॉइंट सिरातला जात आहे. सरते येथे सध्या एक हजार विद्यार्थी आहेत. सुसेवा हे सिरतेचे सर्वात जवळचे विमानतळ आहे. आज इंडिगोची २ उड्डाणे सुसेवा येथे येत आहेत आणि सुमारे ४५० विद्यार्थ्यांना भारतात परत घेऊन जातील. उद्या ४ उड्डाणे सुसेवाला येतील आणि ९००-१,००० विद्यार्थ्यांना घेऊन जातील. असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा  : 

रशिया-युक्रेन युद्धामुळे होळीपुर्वीच तेलाचा उडाला भडका

ओबीसी आरक्षणावर मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला; महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का

 

 

Comments are closed.