Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बुर्गी पोलीस कॅम्प वरील तथाकथित ड्रोन हल्ला हा सपशेल खोटा,बनावटी पोलीस प्रचार आहे, माओवादी पार्टी चा याच्याशी कसलाही संबंध नाही.

ड्रोन हल्याशी माओवादी पार्टीचा याच्याशी कसलाही संबंध नाही.माओवादी प्रवक्ता श्रीनिवास पश्चिम झोनल ब्युरो दंडकारण्य यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस कॅम्प वरील तथाकथित ड्रोन हल्ला हा सपशेल खोटा व बनावटी पोलीस प्रचार आहे, या ड्रोन हल्याशी माओवादी पार्टीचा याच्याशी कसलाही संबंध नाही. माओवादी प्रवक्ता श्रीनिवास पश्चिम झोनल ब्युरो दंडकारण्य यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

गडचिरोली दि,१७ ऑगस्ट : एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस कॅम्प वरील तथाकथित ड्रोन हल्ला हा सपशेल खोटा व बनावटी पोलीस प्रचार आहे. दिनांक ११ ऑगस्ट २०२१ ला गडचिरोली पोलीसांनी मिडीया मध्ये गडचिरोली जिल्यातील बुर्गी पोलीस कैम्प वर माओवाद्यांनी हल्ला केल्याची बातमी प्रसारीत केली. ही सपशेल खोटी व बनावटी आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बुर्गी परिसरात पीएलजीएचे दल गत कित्तेक दिवसांपासुन तिकडे गेलेले नाही. माओवादी पार्टी जवळ कसलेही ड्रोन नाही. हा धादांत खोटा प्रचार आहे. पोलीस असा प्रचार करीत आहे याचा अर्थ त्या मागे काहीतरी षडयंत्र आहे. असाच प्रचार बस्तर रेंजचे आयजी पी. सुदरराज यांनीही केला आहे. हा खोटा व बनावटी प्रचार क्रांतिकारी आंदोलनावर चालू असलेल्या दमनाचा एक भाग आहे. मोदी सरकार व विभिन्न राज्य सरकारांनी मिळून क्रांतिकारी आदोलनाला दाबून टाकण्याकरीता बणविलेल्या समाधान-प्रहार नावाच्या प्रतिक्रांतिकारी दमनकारी धोरणाचाच एक भाग आहे. या धोरणा मध्ये स्पष्टपणे त्यांनी हवाई हल्ले करण्याचे ठरविलेले आहे.

छत्तीसगडच्या बस्तर विभागातील सुकमा जिल्हयाच्या पालागुडा गावाजवळ तेथिल पोलीसानी १९ एप्रिल २०२१ ला ड्रोनव्दारे रात्री १२ बॉम्ब टाकून हल्ला केला होता. त्याचा निषेध देशभरातत जनता व पार्टी तर्फे करण्यात आला होता. सत्ताधारी वर्गाने विशेषतः मोदी सरकारने त्यांच्या ब्राम्हणी हिन्दूत्व फासीवादी विचाराला प्रस्थापित
करण्यासाठी व साम्राज्यवादी तसेच दलाल नौकरशहा भांडवलदारांच्या कंपन्यांना खनिज संपत्तीची बेरोकटोक लुट करण्यास मोकळीक देण्याकरीता कसेही करून माओवादी पार्टीला संपविण्याचा बेत आखला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्या क्रूर फासीवादी योजनेचा हा भाग आहे. त्यांना हवाई हल्ले करण्याकरीता वातावरण तैयार करायचे आहे. त्याना कळून चुकले आहे कि पार्टी जनतेमध्ये खोलवर रूजली आहे व ते जनतेतुन पार्टीला संपवू शकत नाही. काही जनविरोधी शिवाय त्यांना जनतेत थारा नाही. करीता ते असे हवाई हल्ले करून माओवादी क्रांतिकारींना संपवू पाहात आहे. माओवादी भारताचे सच्चे सपूत आहेत. जनतेचे सच्चे सेवक आहेत. व्यवस्था परिवर्तनाची आमची लढाई एक राजकीय लढाई आहे.

स्वातंत्र आंदोलनाच्या काळात क्रांतिकारी लोकांच्या विरोधात इंग्रजांनी सुध्दा हवाई हल्ले केले नव्हते, पण स्वतःला लोकशाहीचे राज्य म्हणवून घेणारे मोदी-ठाकरे-भूपेश बघेल सरकार हवाई हल्ले करू पाहात आहे. कुठे आहेत जे स्वतःला लोकशाहीवादी म्हणविणारे संसदीय नेते ? दुसन्या देशांपासुन संरक्षण करण्याकरीता बणविलेली हवाई सेना आपल्याच देश्यातील जनतेवर हल्ले करताना पाहुन त्यांना काहीच वाटत नाही काय ? लोकशाहीवादी मती कुठे गेली आहे ? आम्ही देशातील व जगातील सर्व जनवादी लोकांना व आम
जनतेला या पत्राव्दारे कळवित आहो कि त्यांनी सरकारच्या या हवाई हल्ला करण्याच्या योजनेच्या विरोधात उठून उभे व्हावे.

हे सरकार कोरोना महामारीत जनतेच्या जीवाचे रक्षण करण्यास सपशेल फेल ठरले, रोजगार देण्यास फेल ठरले, यांच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था पार कोलमडून पडली, शेतक-यांना गुलामीत ढकलणारे कायदे आणले.
कामगार कायद्याना रद्द केले, आदिवासी, दलित, महीला, अल्पसंख्यांक व राष्ट्रीयतावर राज्य हिंसेचा आतक देशात चालू आहे असे कृतितून स्पष्टपणे जनविरोधी ठरलेल्या या सरकारला सत्तेत राहण्याचा कसलाही अधिकार राहीलेला नाही, ते सरकार आता जनतेच्या सच्चा सेवकांवर हवाई हल्ले करीत आहे.

आम्ही पोलीसांच्या या हवाई हल्ले करण्याच्या बेताचा व खोट्या प्रचाराचा घोर निषेध करतो. बुर्गी पोलीस कैम्प वरील हल्ला सपशेल खोटा व बनावटी आहे. हे पोलीसांवरे हवाई हल्ले करण्याकरीता, वातावरण बणविण्याकरीता करण्यात येत असलेला प्रचार आहे. याचा जनतेच्या सर्व थरातुन विरोध व निषेध करावा असे आवाहन करीत असल्याचे माओवादी प्रवक्ता श्रीनिवास पश्चिम झोनल ब्युरो दंडकारण्य यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हे देखील वाचा,

अहेरी,चामोर्शी, मुलचेरा, व भामरागड तालुक्यातील महिला बचत गटांना नवीन रेशन दुकाने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट

जिल्हात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

अखेर… खाजगी शाळांच्या १५ टक्के फी कपात पालकांना मोठा दिलासा

जन्मदिवशी आईला हेलिकॉप्टरमधून मुलांनी घडविली सैर !

Comments are closed.