Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत विमानतळ होण्याची प्रतीक्षा संपली : काही महिन्यातच भूसंपादन होण्याची शक्यता

भूसंपादन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना केले प्राधिकृत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : जिल्ह्यात विमानतळ हवाईपट्टी निर्माण करण्याबाबत गेल्या  १५ ते २० वर्षांपासून चर्चा सुरु आहे. परंतु  महाराष्ट्र  शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवार,  दि. १३ डिसेंबर रोजी विमानतळ  अंमलबजावणीसाठी यंत्रणा व भूसंपादन संस्थांची नियुक्ती करून प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.

जिल्ह्यात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मागील पाच वर्षांपासून रेल्वेमार्गाचे  कामाला प्रत्यक्षात गती मिळालेली आहे. परंतु विमानतळ, हवाईपट्टीचे काम जिल्हावासीयांसाठी दिवास्वप्न वाटत होते. अखेर  राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवार,  दि. १३ डिसेंबर रोजी विमानतळ अंमलबजावणी यंत्रणा व भूसंपादन संस्थांची नियुक्ती करून प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी गडचिरोली यांची  नियुक्ती केलेली आहे. मागील  दोन- तीन वर्षापासून  विमानतळासाठी गडचिरोली तालुक्यातील मुरखळा, पुलखल, कनेरी, मुडझा (बु.), मुडझा (तु.)  या गावातील अंदाजे २२९.४३ हे. आर. खाजगी व शासकीय  जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केली होती. त्यामुळे जिल्ह्यात विमानतळ केव्हा निर्माण होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शासनाच्या वतीने  सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवार,  दि. १३ डिसेंबर रोजी विमानतळ  अंमलबजावणी यंत्रणा व भूसंपादन संस्थांची नियुक्ती झाल्यामुळे जमीन भूसंपादनाच्या कामाला काही महिन्यांतच सुरूवात होण्याची शक्यता असून  यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे विमानतळाबाबत असलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याची शक्यता असून  त्यामुळे जिल्ह्याची कनेक्टिव्हीटी वाढणार असून भूसंपादनाचे दर काय ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष  लागलेले आहे.

मुरखळा- पुलखल भागातील २२९.४३ हे. आर. खाजगी व शासकीय  जमीन  विमानतळाकरिता अंमलबजावणी यंत्रणा, भूसंपादन संस्था म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि भूसंपादन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केलेले आहे. सदर जागा हवाईपट्टीसह विविध विकास कामाकरिता भूसंपादित केली जाणार आहे. त्यामुळे जमिनीला सोन्यासारखा भाव मिळणार आहे. तसेच  या भागातील शेतजमिनीचे दर पुन्हा वधारण्याची शक्यता आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे ही वाचा,

 

Comments are closed.