लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी:11फेब्रुवारी
महाशिवरात्री निमित्ताने आंघोळीसाठी टिकेपल्ली शिवमंदिर जवळ असलेल्या प्राणहिता नदिपात्रात बुडुन मृत्यू झाल्याची घटना दि.११ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली.तेजस पुल्लीवार रा.खमनचेरू वय (२०) असे मृत युवकाचे नाव आहे.सदर मृत युवक हा महाशिवरात्रीच्या आंघोळीसाठी त्यांचे तिन मित्र आकाश मडावी,रा.आलापल्ली अभय जोद्दार,रा बोरी तसेच शीवा मंडल /बिस्वास,रा.आल्लापल्ली हे चार युवक मिळून आंघोळीसाठी मुलचेरा तालुक्यातील टिकेपल्ली येथील शिव मंदीर जवळील प्राणहिता नदीपात्रात गेले मात्र अभयने आंघोळ करण्यास नकार दिला असता तेजस सह त्याचे दोन मित्र शिवा व आकाश हे आंघोळीला गेले असता नदीच्या पाण्याचा अंदाज तेजस ला नआल्याने तो खोल पाण्यात बुडाला .ते बघून त्यांचे दोन मित्र घाबरून धाव हे पाहून अभय हा नदि कडे धाव घेत तेजसला वाचविण्याचा अपयशी प्रयत्न केला .खोल पाण्यात बुडाल्याने तेजस चा मृत्यू झाला बाकी युवकांनी घटनेची माहिती टिकेपल्ली गावातील काही नागरिकांना दिली असता तेथील नागरिकांनी या बाबत अहेरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री प्रविण डांगे यांना भ्रमणध्वनी द्वारे घटनेची माहिती दिली असता घटनास्थळी पोलिस निरीक्षक डांगे यांनी पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे यांच्या सहा.पोलीस हवालदार देविदास मानकर, पोलीस हवालदार काशीनाथ सेडमाके, श्री काशीनाथ दुबे, श्री रोमन फ्रान्सिस तसेच महीला पोलीस हवालदार छाया नेवारे हे घटनास्थळी दाखल झाले.सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक श्री प्रविण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर पाडुळे यांच्या पोलीस हवालदार श्री काशीनाथ सेडमाके व काशीनाथ दुबे हे करीत आहे
Comments are closed.