Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हे सरकार लोफर आहे – माजी ऊर्जामंत्री बावनकुडे यांची घणाघाती टीका

बावनकुडे यांची परखड भाषा.. लोफर म्हणजे खोटे बोलणे - बावनकुडे यांचे स्पष्टीकरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वर्धा, दि. १८ फेब्रुवारी :  महावितरणच्या वीज कनेक्शन तोडण्याच्या भूमिके विरुद्ध गेल्या पाच दिवसापासून आमदार समीर कुणावार यांच्या वर्ध्यात सुरू असलेल्या उपोषणात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी आज हजेरी लावली. यावेळी चंद्रशेखर बावनकुडे यांनी घणाघाती टीका केली आहे.

चक्क बोलताना त्यांनी हे सरकार लोफर आहे असे म्हणत महाआघाडी सरकारवर टीका केली आहे. बोलताना त्यांनी आघाडी सरकारवर अनेक आरोप केले आहेत. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचेच काम हे सरकार करीत आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला आहे. तर आपण सरकारला लोफर म्हटलय यावर माध्यमांनी प्रतिक्रिया घेतली असता लोफर या शब्दाचा अर्थ धादांत खोटे बोलणे असा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या बोलण्यामुळे शिवसेनेचे संजय राऊत हे ज्याप्रमाणे आता आक्रमक होऊ लागले आहे, त्याच पद्धतीने आता भाजप देखील आक्रमक होत असल्याची चर्चा होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखिल वाचा : 

पुस्तक देण्याच्या बहाण्याने आलेल्या शेजारच्या तरुणाने…; त्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक! तरुण प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या…

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्य मार्गदर्शक सुचना जारी

 

 

Comments are closed.