Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बोधली येथील वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू.

घटनेमुळे बोधली गावात भीतीच वातावरण निर्माण झालय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 6 ऑगस्ट :- 

शहरापासून अगदी सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बोधली गावातील इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. मृतकाचे नाव मारुती पिपरे (६५) असून बोधली गावातील रहिवासी आहे. राखीव वनात कक्ष क्रमांक 176 मध्ये गुरे चारत असताना वाघाने हल्ला करून ठार केले आहे. मृतक मारुती पिपरे आपल्या घरचीच गुरे चारण्यासाठी सकाळी झुडपी जंगलात गेला होता. मात्र सायंकाळी चारायला घेऊन गेलेले गुरे वापस घरी परतली मात्र मारुती पिपरे परत न आल्याने गावातील आणि परिवाराने शोधाशोध सुरू केली दरम्यान बोधली गावाजवडील तलावाच्या नहारावर मृतदेह छिन्न विच्छींन स्थितीत वाघाने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गुरु ढोरे चारत असताना नरभक्षक वाघाला मृतक इसम बसल्या स्थितीत दिसला असावा आणि त्यादरम्यानच मृतकावर हल्ला करून जागीच ठार केले असावे असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अंदाज वर्तविला आहे. अगदी गडचिरोली शहरालगत वारंवार वाघाचे हल्ले होत असल्याने नागरिकात दहशत निर्माण झाली असून शेतकऱ्यांनी शेतीत जाणे ही बंद केले आहे

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मदतीचा हात देऊन महिलेचा घात, 24 तासात दोनदा अत्याचार

 

Comments are closed.