लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वसाडी गावात मध्यप्रदेश मधून गावठी पिस्टल विकण्यासाठी आलेल्या दोन इसमांना बुलडाणा गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळून तीन देशी कट्टे व ६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
या कारवाईमूळे पर राज्यातून महाराष्ट्रात बुलडाणा मार्गे देशी पिस्टल विक्रीचा गोरख धंदा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा अनेक कारवाया बुलडाणा पोलिसांनी याआधी सुद्धा केल्या आहेत. मात्र या गावठी पिस्टल च्या गोरखधंद्यावर मात्र पोलिसांना अद्याप टाच आणता आली नाही.
हे देखील वाचा :
‘ड’ वर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करा – खा. अशोक नेते
Comments are closed.