Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ या उपक्रमातुन ‘भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी’मधुन दोन खेळांडुची यु-मुंबा संघाकरीता निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली.दि,18 ऑक्टोबर : पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन ‘वीर बाबुराव शेडमाके भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी’ पोलीस मुख्यालय मैदानावरील वीर शहीद पांडु आलाम या सभागृहात दिनांक-24/09/2021 व 25/09/2021 रोजी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात गडचिरोली जिल्हयातील 10 पोलीस उपविभागांतर्गत अतिदुर्गम भागातील 10 संघातील 120 खेळाडुंनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये उपविभाग गडचिरोलीच्या महाराणा प्रताप क्लब संघाने प्रथम क्रमांक, उपविभाग हेडरीच्या जय ठाकुरदेव क्रिडा मंडळाने दुसरा क्रमांक तर उपविभाग धानोराच्या कबड्डी संघाने तिसरा क्रमांक पटकावला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर स्पर्धेचे परिक्षण करण्यासाठी यु-मुंबाचे टिम लिडर श्री. संदिप सिंग, यु-मुंबा संघाचे उत्कृष्ट खेळाडू श्री. अजिंक्य कापरे व इतर मान्यवर उपस्थित होते. पार पडलेल्या या सामन्यामधुन यु-मुंबा कबड्डी संघाकरीता महाराणा प्रताप कबड्डी संघ गडचिरोलीचे खेळाडु आशिष समीर विश्वास रा. सुभाषग्राम ता चामोर्शि जिल्हा गडचिरोली व लिटील बॉइ्ज क्लब भामरागड कबड्डी संघाचे खेळाडु जिवन सिताराम आतलामी रा. हलवेर ता. भामरागड जिल्हा गडचिरोली या दोन खेळाडुंची निवड झाली असुन ते अहमदाबाद येथे यु-मुंबा टीमच्या कॅम्पमध्ये आपले कबड्डीमधील कौशल्य दाखविण्यासाठी सहभागी होणार आहेत.

आज दिनांक 18/10/2021 रोजी सकाळी 9:30 वाजता या दोन्ही खेळाडुंचा सत्कार समारोह पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथील मिटींग हॉल मध्ये आयोजीत करण्यात आला होता. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा.यांनी यु-मुंबा कबड्डी संघा करीता निवड झालेल्या दोन्ही खेळाडुंचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी मार्गदर्शन करतांना मा.पोलीस अधीक्षक सा. यांनी सांगीतले की, गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गमभागातील जनतेच्या विकासासाठी सतत परीश्रम घेत असुन युवकांना संधी उपलब्ध करुन देत आहे. या संधीचा लाभ घेवुन आपले भविष्य आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न युवक-युवतींनी करावा व विकासाकडे वाटचाल करावी. यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. अनुज तारे सा., पोलीस उप अधीक्षक (अभियान) श्री. भाऊसाहेब ढोले, पत्रकार संघ तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार हे उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

ट्रँक्टरसह वाहुन गेलेल्या पाच जणांना गावकऱ्यांनी वाचवले

…. चक्क प्राचार्यानेच दिली प्राध्यापिकेला गोळ्या घालून मारण्याची धमकी, पिडीत प्राध्यापिकेचा आरोप

तोंडावर स्प्रे मारून तरुणीचे अपहरण करुन पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार

Comments are closed.